Join WhatsApp group

गुरुकृपा होण्यासाठी गुरूंवर संपूर्ण श्रद्धा असणे आवश्यक – दीदी माँ साध्वी अर्पिताजी मानस भारती

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला: 10 जुलै 2025: गुरुपौर्णिमेच्या दिवशी वनदेवी साधिका परिवार आणि श्री गजानन महाराज उपासना महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपूजनाचा भाविक सोहळा संपन्न झाला. यावेळी गुरुवर्य परमपूज्य दीदी माँ साध्वी अर्पिताजी मानस भारती यांचा तसेच सद्गुरु श्री गजानन महाराज यांचा पूजन समारंभ भक्तिभावाने पार पडला.

दीदी माँ अर्पिताजी यांनी उपस्थित साधकांना गुरुंच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना सांगितले की,”गुरुकृपा लाभण्यासाठी गुरुंवर संपूर्ण श्रद्धा असणे अत्यावश्यक आहे. गुरुसेवा म्हणजे केवळ सेवा नव्हे, तर त्यांच्या आज्ञेचे पूर्ण पालन करणे होय.”त्यांनी ‘अनुसंधान’ या संकल्पनेचे स्पष्टीकरण देताना स्पष्ट केले की, प्रपंच करतानाही गुरुंच्या आठवणीचे भान ठेवणे हेच खरे अनुसंधान होय.

सद्गुरु आपल्याला केवळ मार्गच दाखवत नाहीत, तर संकटांना सामोरे जाण्याची शक्तीही देतात. प्रारब्ध बदलत नसले तरी त्याचा परिणाम सौम्य होतो.”नामस्मरण हेच साधन आणि तेच साध्य आहे”, असे सांगताना त्यांनी सद्गुरुंच्या चरणी अखंड श्रद्धा आणि निष्ठा ठेवण्याचे आवाहन केले.

गुरुप्राप्ती ही भगवंताच्या कृपेनेच होते आणि गुरूंच्या कृपेनेच आत्मोद्धार शक्य होतो, असे ते म्हणाल्या.

गुरुंविना ज्ञान नाही, ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही, या मूलमंत्राचा उल्लेख करत त्यांनी गुरूंच्या अवहेलनामध्ये होणाऱ्या अपायांचेही स्पष्ट शब्दांत भान दिले.

“गुरु हेच साक्षात् ईश्वर आहेत” ही भावना दृढ केली पाहिजे, असं त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाला वर्षा जंजाळ, जया जंजाळ, ज्योती कांडलकर, माया यावले, सुषमा कांडलकर, शितल कांडलकर, मीनाताई पांडे, रेखा देवकर, आरती पळसोकर, मंदाताई श्रीखंडे, सपना सायरे, चैताली कावलकर, संध्याताई व्यवहारे आदींची उपस्थिती होती.कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!