Join WhatsApp group

मुर्तिजापूरात अवैध गोवंश कत्तल करणारे तिघे अटकेत; कुरेशी समाजाची प्रतिमा धोक्यात

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर (प्रतिनिधी) – शहरातील परदेशीपुरा परिसरात स्वतःच्या घरात अवैधपणे गोवंश कत्तल करून विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी रंगेहात पकडले. या कारवाईत ८० किलो गोमांस, धारदार कत्तलीची शस्त्रे असा एकूण २४,७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुप्त माहितीनुसार, ड्युटीवर तैनात असताना पोलिसांनी छापा टाकून अब्दुल जाफर अब्दुल हन्नान, अब्दुल इरफान अब्दुल हन्नान आणि अब्दुल सुलतान अब्दुल हन्नान या तिघांना अटक केली.

कारवाईदरम्यान ठाणेदार अजित जाधव, पोलिस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, नितीन राठोड, हेडकॉन्स्टेबल सुरेश पांडे, मंगेश विल्हेकर, सचिन दुबे, गजानन खेळकर, कृष्णा येलमुरे आणि सोमनाथ फुके उपस्थित होते.

कुरेशी समाजाचा निर्णय, पण इतरांनी घेतला व्यवसायाचा ताबा

देशभरात गोहत्याबंदी लागू झाल्यापासून सतत कुठल्या ना कुठल्या पोलीस ठाण्यात गोहत्या व तस्करीसंबंधी गुन्हे नोंदवले जात आहेत. पिढ्यान्‌पिढ्या मटण व कोंबडी व्यवसायाशी निगडित असलेल्या कुरेशी समाजातील काही जण पूर्वी कत्तलखाने चालवत होते.

मात्र अलीकडेच देशभरातील कुरेशी समाजाने समाजपातळीवरील बैठका घेऊन गोवंश हत्येला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. कायद्याच्या कचाट्यात भावी पिढी सापडू नये आणि समाजावर कोणताही कलंक लागू नये, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला. या धाडसी पावलाचे देशभरातून स्वागत झाले.

पण, कुरेशी समाजा बाहेरील काही व्यक्तींनी या संधीचा फायदा घेत पुन्हा अवैध कत्तलखान्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. परिणामी, अशा घटनांचा ठपका पुन्हा कुरेशी समाजावर ठेवला जात असून, त्यांच्या प्रतिमेला धक्का बसत आहे. समाजातील अनेकांचे मत आहे की अशा गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर कारवाई करून निर्दोष समाजाची बदनामी थांबवावी.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!