Join WhatsApp group

आजकाल लोन करतो असे फोन call येण्याचे प्रमाण खूपच वाढलाय, त्यातच या तक्रारी सुद्धा खूप वाढल्यात , जाणून घेऊ फायनान्स किंवा कर्ज कायं असतं ते….

Photo of author

By Sarkarmzanews

Share

फायनान्स किंवा लोन म्हटलं तर प्रत्येकाचा हा जवळचा विषय असतो. आयुष्याचा कोणत्या तरी वळणावर प्रत्येक जण लोन भेटेल का किंवा फायनान्स चा वापर करून आपल्या तीर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.


नवीन मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायचा झाला तर conusmer Loan, गाडी घ्यायची असेल तर कार लोण, घर घेताना होम loan, शिक्षण घेताना सुद्धा लोन आपण घेऊ शकतो Education लोण , त्वरित लोण हवे असल्यास Gold लोण आहे, व्यापारासाठी तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोण सुविधा उपलब्ध आहे थोडक्यात बोलायचं तर CGTSME, stand Up, मुद्रा लोण, overdraft सुविधा, Start Up , working capital लोण, Business लोण असे खूप सुविधा उपलब्ध आहेत. त्याच बरोबर प्रत्येक उद्योजकला आपली balance sheet , profit and Loss account वाचता आलाच पाहिजे , त्यामध्ये capital account , Debtors, creditors, Stock आपली DP power काय असते , आपली व्यवसायाची कर्जाची गरज किती हे समजलं पाहिजे.

या झाल्या कर्जाचे प्रकार पण या घेण्यासाठी त्या त्या लोण साठी लागणारे document आपल्याकडे असणे आवश्यक आहे. आपले CIBIL चांगले असणे आवश्यक आहे. CIBIL म्हणजे नेमकं कायं, CIBIL म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचे कर्ज या पूर्वी घेतले आहे का, त्याची परतफेड तुम्ही वेळेत केली आहे ना , किती वर्षासून तुम्ही लोण घेत आहात, कोण कोणत्या प्रकारचे कर्ज तुम्ही घेतले आहेत.

या सर्व गोष्टीचा लेखा जोखा हा cibil मध्ये दिसतो. आता तो कसा दिसत असेल हा प्रश्न असेल तर प्रत्येक bank ल आपल्या कर्जा संबंधित माहिती ही CIBIL ल देणे बंधनकारक आहे, आपलं कर्ज परतफेड चांगली असेल तर आपले points वाढतात आणि bank समोर आपले कर्ज मूल्यांकण सुद्धा वाढते, म्हणजे प्रत्येकाने आपला CIBIL हा ६ महिन्यातून एकदा तरी तपासून घ्यावा, म्हणजे कर्ज घेताना आपली CIBIL ची बाजू मजबूत राहते.


फायनान्स किंवा कर्ज या विषयावर खूप सांगता येईल या साठी तुमच्या जवळ हक्काचा, भरोसेमंद फायनान्स सल्लागार असायला हवा.. महत्वाचं म्हणजे उद्योजक यांच्याकडे तरच हवाच कारण प्रत्येक उद्योगाचा प्राणवायू हा working capital असतो म्हणजेच खेळत भांडवल .
शेवटी एकच तुम्हला कर्ज संबंधित लागणारे document, तुमचा cibil आणि योग्य फायनान्स सल्लागार असणे खूप गरजेचे आहे.

आनंद बाळकृष्ण डावरे
BuzzGrow Advisory Pvt Ltd
( शाखा : ठाणे , नवी मुंबई )


Share

Leave a Comment

error: Content is protected !!