Join WhatsApp group

कुरणखेड येथील श्री चंडिका देवी संस्थानवर पुन्हा चोरी एका वर्षात दोन तर आतापर्यंत पाचवी घटना; पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह

Photo of author

By Sarkarmzanews

Share

कुरणखेड – दिनांक ३० : (योगेश विजयकर) अकोला जिल्ह्यातील जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरणखेड येथील श्री चंडिका देवी संस्थान वर पुन्हा एकदा मध्यरात्री चोरीची घटना घडली. मंदिरातील दोन प्रमुख दानपेट्या फोडून सुमारे ६० ते ७० हजारांची रक्कम लांबवण्यात आली. गेल्या एक वर्षात दोन तर एकूण पाच वेळा घडलेल्या चोरींच्या मालिकेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रीय महामार्गालगत व बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारे हे मंदिर दररोज भाविकांनी गजबजलेले असते. नवरात्रात तर येथे हजारो भाविकांची यात्रा भरते. मात्र ता. ३० च्या मध्यरात्री १ ते २ दरम्यान चोरट्यांनी मंदिराचा सुरक्षा कवच भेदले. मुख्य हॉलमधील पेटी तसेच हनुमान मंदिरातील पेटी फोडण्यात आली. विशेष म्हणजे एक पेटी वरून खाली हॉलमध्ये आणून निर्भीडपणे फोडण्यात आली.
रात्रीच्या चौकीदाराच्या उपस्थितीतच घटना घडल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


या अगोदरही पाच चोरी — पोलिसांची दाक्षिण्य?

मागील काही वर्षांपासून या मंदिर परिसरात चोरीची मालिका सुरूच आहे. २७ एप्रिल २०२५ रोजीही येथे मोठी चोरी झाली होती. आतापर्यंत लाखो रुपयांची रक्कम दानपेट्यांतून लंपास झाली असून अनेकदा डॉग स्क्वॉड, विविध तपास पथके येऊनही एकही आरोपी पोलिसांना अद्याप मिळालेला नाही.
यामुळे बोरगाव मंजू पोलिसांवरील संशय अधिक गडद होत असून गावकऱ्यांत नाराजी वाढली आहे.


सीसीटीव्हीत तेच चोर पुन्हा दिसले — तरीही पोलिसांच्या हाती पुरावे नाहीत

२७ एप्रिल २०२५ रोजीच्या चोरीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारेच त्याच तीन चोरांचे चेहरे कालच्या चोरीतही स्पष्टपणे दिसत असल्याचे संस्थानने सांगितले.
मात्र तरीही पोलिसांना त्यांचा थांगपत्ता लागत नाही, ही बाब स्थानिकांत चर्चेचा विषय ठरली आहे.


पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी चोरी टळली

चोरी सुरू असतानाच रात्री गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे व हेड कॉन्स्टेबल जंजाळ यांनी मंदिर परिसरात एन्ट्री केल्याने चोर घाबरून गेले. त्यामुळे चोरांनी तिसरी दानपेटी फोडणे टाळून पळ काढल्याचे समोर आले. पोलिसांच्या वेळेवर पोहोचण्यामुळे पुढील मोठी घटना टळल्याचे सांगितले जाते.


“हा तपास CID कडे द्या” — नागरिकांची जोरदार मागणी

वारंवार होणाऱ्या चोरी, न मिळणारे आरोपी आणि पोलिसांच्या निष्क्रीय भूमिकेमुळे कुरणखेड गावकऱ्यांनी आता या सर्व चोरींचा एकत्रित तपास CID कडे देण्याची मागणी जोरदारपणे केली आहे.
वृत्त लेखनावेळी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!