Join WhatsApp group

९ लाख रुपायची चोरी गेलेली रक्कम २४ तासाचा आत आरोपीचा शोध घेवुन मुददेमाल हस्तगत.

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला शहरातील पोस्टे – खदान, ह‌द्दीत केडीया कॉम्प्लेक्स गौरक्षण रोड मधुन महावितरण विभागातील कर्मचारी यांचे भविष्य निवार्ह निधीचे चोरी गेलेली रक्कम ९,००,०००/- रूपये २४ तासाचे आत आरोपीचा शोध घेवुन मुददेमाल हस्तगत करण्यात आला

दिनांक २२/०६/२०२५ शाम नंदलाल जांबे टेक्नीशियन, महावितरण विभाग अकोला यांनी पोस्टे खदान येथे तक्रार दिली की होती कि , दिनांक २०/०६/२०२५ रोजी अकोला शहरातील महावितरण विभागात टेक्नीशीयन पदावर काम करणाऱ्या कर्मचारी यांनी त्याचे जि.पि.एफ चे बँकेत जमा झाले होते.

२० /६ /२०२५ रोजी भारतीय स्टेट बँकेंगुन विड्रॉल केलेले ९,००,०००/- रूपये घरी घेवुन जात असतांना अचानक प्रसुती बिघडल्याने विश्रांती करीता केडीया कॉम्प्लेक्स, गौरक्षण रोड येथे विश्रांती घेत असतांना झोप लागल्याने त्याचा पिशवीमधील ९,००,००० रुपये कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केल्याने आरोपी यांचे विरुध्द पोस्टे खदान येथे जबानी रिपोर्ट वरून अप क ४९२/२०२५ कलम ३०३ (२) बि.एन.एस प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदर गुन्हयाचे तपासात पोलीस निरीक्षक मनोज केदारे, पोस्टे खदान सोबत पोस्टे डि.बि. पथक अंमलदार यांनी नमुद गुन्हयातील आरोपींचा तात्काळ शोध घेवुन गुन्हयातील आरोपी नामे विवेक आगस्टीन इंगळे वय ३१ वर्षे, धंदा – आर्कीटेक रा रामदासपेठ अकोला याचे कडुन गुन्हयातील चोरी गेलेला मु‌द्देमाल ९,००,०००/- रूपये जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई मा. श्री. अर्चित चांडक, पोलीस अधिक्षक सा अकोला, अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. अभय डोंगरे सा, मा.श्री. सतिष कुलकर्णी सा उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला यांचे मार्गदशनाखाली मा. श्री मनोज केदारे, पोलीस निरीक्षक पोस्टें खदान पोहेकों निलेश खंडारे, पोहेकों/ अमित दुबे, पोहकों/जय मंडावरे, पोहेकों विजय गुलनकर, पांका/अभिमन्यु सदाशिव, पोकों वैभव कस्तुरे यांनी सदरची कारवाई केली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!