Join WhatsApp group

मुर्तीजापूर आठवडी बाजार परिसरात मटन मार्केटचा दुर्गंध : सराव करणाऱ्या खेळाडूंचा आरोग्य धोक्यात! – नगर परिषदेचे दुर्लक्ष

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर, ता. २८ जून २५
मुर्तीजापूर येथील आठवडी बाजाराच्या दुसऱ्या दिवशी मटन मार्केटमधून उठणाऱ्या दुर्गंधीमुळे परिसरात अस्वच्छता व आरोग्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. विशेषतः या मार्केटच्या जवळच असलेल्या तालुका क्रीडा संकुलनागरिक वस्ती असल्यामुळे येथील नागरिक व खेळाडूंना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

बाजार भरल्यानंतर मटन विक्रेत्यांनी मांसाचे अवशेष तसेच रक्तवहिन्या व उरलेला कचरा खुलेआम टाकल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्यामुळे साचलेले पाणी आणि त्यात मिसळलेला जैवकचरा रोगराईला आमंत्रण देत आहे. यामुळे मच्छर व इतर कीटक वाढले असून डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

यासंदर्भात नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून उपाययोजना झालेली नाही. स्थानिक नागरिक तसेच क्रीडा संकुलात सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी केली आहे.

प्रशासनाकडे मागणी:

  • मटन मार्केटचा जैवकचरा नियमितपणे उचलणे
  • दुर्गंध रोखण्यासाठी कीटकनाशक फवारणी

जर लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!