Join WhatsApp group

मूर्तिजापुर नगरीत टॅक्स भरणाऱ्या सामान्य नागरिकांची दूरवस्था – द्वारकाप्रसाद रामदास दुबे मा. नगराध्यक्ष, मूर्तिजापुर

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापुर (३० जून २०२४): मूर्तिजापुर येथील जुनी वस्ती प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिक सध्या मोठ्या समस्येला सामोरे जात आहेत. या भागातील कचरा अनेक दिवसांपासून उचलण्यात आलेला नाही, ज्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या गंभीर समस्येमुळे स्थानिक टॅक्स भरणाऱ्या सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे, नागरिकांनी वेळोवेळी मूर्तिजापुर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना याबाबत तक्रारी दिल्या असतानाही, त्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत असून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत – मुख्याधिकारी मूर्तिजापुरमध्ये आहेत का? आरोग्य विभाग याकडे लक्ष देणार का? नागरिकांचे आरोग्य प्राधान्याने महत्त्वाचे मानले जात आहे का?

ही समस्या उघडे यांच्या कारखान्याजवळील भागात अधिक तीव्रतेने जाणवते. नागरिकांनी साफ शब्दात सांगितले आहे की, जर लवकरात लवकर ही समस्या सोडवली नाही, तर ते तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबतील.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!