Join WhatsApp group

बहुचर्चित अक्षय नागलकर खून प्रकरणाचा उलगडा — मुख्य आरोपीसह ४ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला (दि. २५ ऑक्टोबर) — अकोल्यातील अक्षय विनायक नागलकर या युवकाच्या रहस्यमय बेपत्ता प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून पोलिसांनी मुख्य आरोपीसह चार जणांना अटक करण्यात यश मिळवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी सुमारास अक्षय नागलकर (वय २६, रा. मारोती नगर, बाळापुर रोड, जुने शहर अकोला) हा घराबाहेर गेला होता. परंतु तो परत न आल्याने त्याची आई सौ. शिला विनायक नागलकर यांनी पोलीस ठाणे डाबकी रोड येथे फिर्याद दिली होती. त्यानुसार मिसिंग क्रमांक ४४/२०२५ नोंद करण्यात आला होता.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी विशेष तपास पथक गठीत करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग व डाबकी रोड पोलिसांच्या एकूण आठ पथकांनी शोधमोहीम सुरू केली. सुमारे ४८ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पथकाला गुप्त माहितीच्या आधारे संशयित चंद्रकांत बोरकर यास ताब्यात घेण्यात आले.

सखोल चौकशीत चंद्रकांत बोरकर याने धक्कादायक खुलासा करत कबुली दिली की, त्याने आपल्या साथीदारांसह अक्षय नागलकरचा खून केला आहे. जुन्या वादाच्या कारणावरून त्यांनी अक्षयला ब्रम्हा भाकरे यांच्या भौरद येथील हॉटेल “MH 30” येथे जेवणाच्या बहाण्याने बोलावले. तिथे त्याच्यावर हल्ला करून त्याचा खून केला आणि नंतर त्याचे शव ब्रम्हा भाकरे यांच्या मोरगाव भाकरे येथील शेतातील टिनाच्या शेडमध्ये नेऊन जाळले.

या कबुलीच्या आधारे पोलिसांनी १) चंद्रकांत महादेव बोरकर, २) अशोक उर्फ ब्रम्हा पांडुरंग भाकरे, ३) किष्णा वासुदेव भाकरे, व ४) आशु उर्फ आशिष शिवकुमार वानखडे या चार आरोपींना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन पाटील, प्रभारी अधिकारी श्री. अभिषेक अंधारे, सपोनि गोपाल ढोले, पोउपनि गोपाल जाधव (स्थानिक गुन्हे शाखा), पोउपनि अनिल चव्हाण, तसेच डाबकी रोड पोलिस स्टेशन व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील अंमलदार यांच्या पथकाने पार पाडली.

अक्षय नागलकरच्या बेपत्ता प्रकरणाने अकोला जिल्ह्यात खळबळ उडवली होती. अखेर पोलिसांच्या सतर्क आणि जलद तपासामुळे या बहुचर्चित प्रकरणाचा उलगडा झाला असून आरोपींच्या अटकेने जिल्ह्यात दिलासा व्यक्त होत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!