Join WhatsApp group

Ads

-

न्यायालयीन आदेशानंतरही वाहन न सोडल्याचा मुद्दा माना पोलीस स्टेशनमधील प्रकार चर्चेत

By Sarkarmzanews

December 28, 2025 6:44 pm

Ads

मुर्तिजापूर | दिनांक २८ : मुर्तिजापूर तालुक्यात माना येथे जप्त वाहन सोडण्यासंदर्भात न्यायालयीन आदेश असूनही माना पोलीस स्टेशनकडून वाहन न सोडल्याचा प्रकार सध्या चर्चेत आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, वाळू चोरीचा तपासाअंतर्गत वाहन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात माननीय प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, मुर्तिजापूर यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वाहनधारकास जप्त वाहन सुपूर्द करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर वाहनधारक न्यायालयाचा आदेश घेऊन माना पोलीस स्टेशनमध्ये गेला असता, तहसीलदार कार्यालयाकडील पुढील प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आल्यामुळे वाहन सोडण्यात आले नाही.

न्यायालयाचा लेखी आदेश असूनही वाहन मिळाले नसल्याने वाहनधारकास आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत वाहनधारकाने वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच संबंधित विभागांकडे निवेदन सादर केले आहे.

दरम्यान, या प्रकरणी माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार नावकर यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार न्यायालयीन आदेशासोबतच तहसीलदार यांच्याकडील दंडात्मक कारवाई पूर्ण होणे आवश्यक आहे. संबंधित कारवाई पूर्ण झाल्यानंतर वाहन तात्काळ सोडण्यात येईल.

या प्रकरणामुळे न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी व प्रशासकीय प्रक्रियेसंदर्भात चर्चा सुरू असून, महसूल विभागांकडून दंडात्मक कारवाई प्रक्रिया करून वाहन सोडण्यात येईल.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!