Join WhatsApp group

पोह्यांमध्ये चक्क पालीचा मुंडक अन्न व औषध विभागाचे हॉटेल व्यवसायिकांवर नाही राहिले वचक

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला – अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना रोज नाश्ता दिला जातो, मात्र हा नाश्ता फक्त कागदोपत्री असल्याचे आरोप रुग्ण वारंवार करीत आहेत.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच रुग्णालय प्रशासनाला सुविधा सुधारण्याचे निर्देश दिले होते.मात्र, आज पुन्हा एक धक्कादायक प्रकार घडला. शेख सोहेल हे रुग्ण वार्ड क्रमांक 32 मध्ये उपचार घेत असताना त्यांनी रुग्णालयासमोर असलेल्या अग्रवाल हॉटेल मधून पोह्यांचा नाश्ता आणला.

नाश्ता करताना त्यांच्या पोह्यात चक्क पालीचे मुंडके आढळून आले. हा प्रकार पाहून ते हादरले, त्यानंतर त्यांना मळमळ, उलटीसारखा त्रासही सुरू झाला. डॉक्टरांकडे तक्रार केल्यानंतर “तुम्ही लवकर बरे व्हाल” असे सांगण्यात आले, मात्र तातडीची वैद्यकीय कारवाई झाली नाही, असा आरोप आहे.

या घटनेमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील अन्नव्यवस्थेवर आणि शहरातील हॉटेल्सच्या स्वच्छतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अन्नपुरवठा विभाग अकोला येथील हॉटेल्सकडे योग्य ती तपासणी न करता दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या प्रकारानंतर जिल्हा प्रशासनाने रुग्णालयातील अन्न व औषध विभागाने रुग्णसेवा सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!