Join WhatsApp group

सेवानिवृत्त पोलिसांचा सन्मान सोहळा उत्साहात पडला पार – पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे मार्गदर्शन

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला | १ जुलै २०२५

अकोला पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा सत्कार सोहळा पोलीस अधीक्षक कार्यालयातील “विजय हॉल” येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली जून २०२५ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या १६ अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

या सत्कार सोहळ्यात खालील अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला:

  1. पोउपनि जगदीश दादाराव फुंडकर
  2. पोउपनि सुभाष प्रल्हादराव पहुरकर
  3. श्रेणी पोउपनि प्रकाश विठ्ठलराव पिंजरकर
  4. श्रेणी पोउपनि देविदास रामदास ग्यारल
  5. सपोउपनि कैलास हरिवंद्र ताथोड
  6. सपोउपनि उमेश विठ्ठलराव इंगळे
  7. सपोउपनि सुनिल गुस्दयाल जमुनाह
  8. सपोउपनि जितेंद्र शेषराव कातखेडे
  9. मोहनलाल विश्वनाथ विर्वोळकर
  10. सपोउपनि मोहम्मद रफिक शेख
  11. सपोउपनि प्रल्हाद देविदास कुरकुरे
  12. सपोउपनि वसंत महादेव खैरे
  13. सपोउपनि सुनिल नित्यहरी मुजुमदार
  14. सपोउपनि अनिल वसंतराव डिवरे
  15. पोहवा हशमत खान दाउद खान पठाण
  16. पोशि रामेश्वर नामदेव मांगुळकर

कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात आनंदाचे वातावरण होते. उपस्थितांनी आपल्या मनोगतातून सेवा काळातील अनुभव आणि समाधान व्यक्त केले. पोलीस विभागाकडून अशा सन्मानाची परंपरा सुरू ठेवण्याची अपेक्षा अनेकांनी बोलून दाखवली.

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आपल्या भाषणात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. त्यांनी कुटुंबाला वेळ देण्याचे आणि छंद जोपासण्याचेही महत्व पटवून दिले. तसेच प्रत्येक सत्कारमूर्तीला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राखीव पोलीस निरीक्षक श्री. गणेश जुमनाके व त्यांच्या पथकाने विशेष मेहनत घेतली, तर आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन पोहवा गोपाल मुकुंदे यांनी केले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!