Join WhatsApp group

प्रशासनाने कावड धारकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून व्यवस्था कडक ठेवावी – आमदार रणधीर सावरकर

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : ७ जुलै २५ : अकोल्यातील ग्रामदेवता श्री राजेश्वर महादेव यांना जलाभिषेक करण्याची परंपरा गेल्या ७८ वर्षांपासून सुरू असून, यंदा ही कावड यात्रा १४ जुलै ते १८ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील विविध भागांतून कावड यात्रा निघणार असून, शिवभक्तांच्या सोयीसाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

शिवभक्तांशी संवाद, समस्या जाणून प्रशासनाला तात्काळ सूचना

अकोला शहरातील पूर्णा नदी (गांधीग्राम) येथून जल भरून भाविक राजेश्वर मंदिरात जलाभिषेकासाठी जातात. या भाविकांच्या सुविधा आणि सुरक्षेचा विचार करून आमदार सावरकर यांनी अकोट, अकोला, मूर्तिजापूर, पातूर, बार्शीटाकळी येथून येणाऱ्या शिवभक्तांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

त्यांनी विविध मंडळांतील कार्यकर्ते आणि भक्तजना –पवन महल्ले, संतोष पांडे, करण शाहू, नितीन राऊत, उज्ज्वल बामणे, हर्षद चौधरी, हेमंत सातवाळे, दीपक पवार, सतीश ढगे, अनिल गरड, संजय अग्रवाल, अमोल गीते, विजय चौधरी आदींशी चर्चा केली. जी.जे.पी.चे नेते आणि इतर शिवभक्त यावेळी उपस्थित होते.

महत्वाच्या विभागांना सूचना :

रस्ते, पथदिवे आणि पाणीपुरवठा महत्त्वाचे यात्रे दरम्यान भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून महापालिका, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग यांना आमदार सावरकर यांनी पथदिवे सुरू ठेवणे, रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, यासाठी तातडीच्या सूचना दिल्या.

“शिवभक्तांच्या भावना सर्वोपरी” – आमदार सावरकर

आमदार सावरकर म्हणाले, “शिवभक्त हे सनातन परंपरेचा पुरस्कार करणारे आहेत. त्यांच्या भावना लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आकाश फुंडकर व भाजपा प्रतिनिधी भाविकांच्या सेवेसाठी निधीची कमतरता भासू देणार नाहीत.”

या वर्षी कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती संख्या आणि त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज राहणे आणि नियोजनबद्ध काम करणे आवश्यक आहे, असे मत सर्व स्तरांतील शिवभक्त व सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!