Join WhatsApp group

मुर्तीजापुर तालुक्यात पायटांगी जवळ भीषण अपघात — ट्रॅक्टर, ऑटो व कारची धडक; ऑटोचालक ठार, दहा जखमी

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर : दिनांक २३ ऑक्टोबर २५:

पाय टांगी गावाजवळ आज सायंकाळी सुमारे ७:३० वाजता एक भीषण अपघात घडला असून ट्रॅक्टर, ऑटो आणि कार यांची समोरासमोर धडक होऊन एकाचा मृत्यू तर दहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ट्रॅक्टर जात असताना मागून येणारी मारुती कारही ट्रॅक्टरला जाऊन धडकली. समोरून येणाऱ्या ऑटोला जोरदार कारने ऑटोला धडक दिली. दरम्यान या अपघातात ऑटोचालकाचा जागीच मृत्यू झाला असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

जखमींमध्ये —महेश मुगल (वय 28, रा. सोनाळा)

निर्मला विठ्ठलराव गायकवाड (वय 60, रा. दातवी)

राहुल वानखडे (वय 32, रा. लोणी टाकळी)

शिवम मेहरे (वय 27, रा. लाखपूरी)

वैभवी मेहरे (वय 38 रा. लाखपूरी)

साची संदीप जळमकर (वय 32 रा, मुर्तिजापूर)

श्रेयस तिडके (वय 35 रा. मूर्तिजापूर)

तसेच आणखी तीन अनोळखी व्यक्ती जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

घटनेनंतर शासकीय ॲम्बुलन्स तसेच संत गजानन महाराज संस्थेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

सर्व जखमींना प्राथमिक उपचार लक्ष्मीबाई देशमुख सामान्य रुग्णालयात देण्यात आले असून त्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या अपघातामुळे परिसरात मोठी गर्दी झाली असून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यासह पुढील तपास सुरू केला आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!