Join WhatsApp group

बंदुकीच्या धाकावर नेलं, मारहाण करत लघवी प्यायला लावली’, दलित तरुणासोबत काय घडलं?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

न्यूज डेस्क : २४ ऑक्टो. २५ : मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात २० ऑक्टोबर रोजी ३३ वर्षीय ज्ञानसिंह जाटव, जे व्यवसायाने चालक आहेत, यांच्यावर अमानवी अत्याचार करण्यात आला. त्यांनी एका स्थानिक व्यक्तीसाठी (सोनू बरुआ) ड्रायव्हर म्हणून काम करण्यास नकार दिला, यामुळे आरोपींनी रागाच्या भरात ज्ञानसिंह यांचे अपहरण करून बंदुकीच्या धाकावर मारहाण केली आणि जबरदस्तीने त्यांना लघवी पिण्यास भाग पाडले.

ज्ञानसिंह हे दलित समाजाचे असल्याने त्यांनी प्रश्न विचारला —

“जर मी दलित नसतो, तर मला लघवी प्यायला लावली असती का?”

या घटनेने जातीय भेदभावाच्या क्रूर वास्तवाकडे पुन्हा लक्ष वेधले आहे.

तक्रारीनुसार, या प्रकरणात आरोपी सोनू बरुआ, आलोक शर्मा आणि छोटू या तिघांविरुद्ध मारहाण, अपहरण आणि अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही अटक करण्यात आली असून पोलिस तपास सुरू आहे.

ज्ञानसिंह यांच्या पत्नी पिंकी जाटव यांनी सांगितले की, त्यांना इतकी मारहाण झाली की दोन दिवसांपासून ते रुग्णालयात आहेत, आणि “शरीरावरील जखमा भरतील, पण जे अपमान झालं, ते आयुष्यभर विसरणं अशक्य आहे.”

ही घटना गेल्या १५ दिवसांत मध्य प्रदेशात नोंदवलेल्या दलित अत्याचाराच्या तिसऱ्या मोठ्या प्रकरणांपैकी एक आहे. यापूर्वी कटनी जिल्ह्यात देखील अशाच प्रकारे एका दलित व्यक्तीला मारहाण करून लघवी प्यायला लावल्याची घटना घडली होती.

या सर्व घटनांमुळे मध्य प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!