Join WhatsApp group

अवैध पेट्रोल व्यवसायात ‘मुर्तिजापूरचा एक तरुण’ चर्चेत – इथेनॉल पुरवठ्याचा गूढ धागा; तीनही जिल्ह्यांत कुजबुज वाढली

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर : दिनांक ०९ : अकोला, वाशीम आणि बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यांत अवैध पेट्रोल व्यवहार शिगेला असून खुले आम हे व्यवसाय आजपण सुरु आहे. या व्यवहाराला इथेनॉलचा पुरवठा करण्याबाबत एका मुर्तिजापूरचा तरुणाचे नाव सतत चर्चेत येत असल्याने मोठी खळबळ निर्माण झाली आहे. अकोला, वाशीम आणि बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यांत अवैध रित्या व्यवसायिकांना इथेनॉलचा पुरवठा करत आहे.

स्थानिक सूत्रांनुसार, संबंधित नावेद नामक तरुण हा उच्च शिक्षित असून वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित डिग्री घेतलेला असल्याची माहिती समोर येते आहे. मात्र रुग्णसेवा बाजूला ठेवून इथेनॉल पुरवठा या संशयित साखळीत तो गुंतल्याची चर्चा नागरी वर्तुळात जोर धरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अवैध पेट्रोल डिझल व्यवसाय करणारे पेट्रोल डिझल मध्ये इथेनॉलचे मिश्रण करून लिटर प्रमाणे माप वाढवत आहे. जसे दुधात पाणी मिश्रण होतो तसे आणि तेच पेट्रोल डिझल विविध टपऱ्या आणि छोट्या विक्रेत्यांकडे पोहोचवले जात असल्याचा चित्र जिल्हाभर दिसत आहे.

जे पेट्रोल डीझेल टपऱ्या आणि छोट्या विक्रेत्यांजवळ आहे ते ग्रहांकान साठी कितपत योग्य? त्याचे मूल्यमापन व गुणवत्तेचे जबाबदार कोण?

चर्चेनुसार, या व्यवहारातून दररोज लाखोंची उलाढाल होत असून काही जणांनी अशा मार्गाने आर्थिक उंची गाठल्याचे बोलले जाते. महसूल, उत्पादन शुल्क आणि इंधन नियंत्रणाशी संबंधित विभागांना चकवा देत शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.


अकोला जिल्ह्यातील प्रश्न गंभीर — “एसपी अर्चित चांडक ‘ऑपरेशन प्रहार’मध्ये कारवाई करतील का?”

जिल्ह्यात अवैध धंद्यांवर गंडांतर घालण्यासाठी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ मोहिमेमुळे अनेक तालुक्यात मोठ्या कारवाया झाल्या आहेत. पण मात्र या उघड व्यवसायावर कारवाई का नाही ? अकोला जिल्ह्यातील नागरिकांमध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

“अवैध पेट्रोल व इथेनॉल पुरवठा साखळीवर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक निर्णायक कारवाई करतील का?”

अवैध पेट्रोलचा प्रवाह, त्याची वाहतूक, साठेबाजी, पुरवठा व टपरी पातळीवर होणारी विक्री — या सर्वांवर कठोर तपासाची मागणी जनतेकडून होत आहे.


प्रशासनावरही संशयाची सुई — महसूल गळती असूनही कारवाई धीमीच का?

या प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न प्रशासनाच्या भूमिकेवर उपस्थित होत आहे.

नागरिकांकडून असे सर्रास बोलले जात आहे की—
अवैध पेट्रोल साखळी तिन्ही जिल्ह्यांत सक्रिय असताना महसूल विभाग, उत्पादन शुल्क शाखा आणि स्थानिक प्रशासन यांची कारवाई इतकी मंद का?

महसूल बुडवणी दररोज लाखोंच्या घरात सांगितली जात असताना
– निरीक्षण यंत्रणा कुठे आहे?
– तपासात कोणती अडथळे आहेत?
– कोणाचा आशीर्वाद किंवा संरक्षण मिळतेय का?

असे थेट प्रश्न नागरिकांतून पुढे येताना दिसत आहेत.

अवैध पेट्रोल आणि इथेनॉल व्यवहारातील गूढ धागे, वाढती चर्चा आणि प्रशासनाची भूमिका — या सर्वांवर आता तिन्ही जिल्ह्यांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!