Join WhatsApp group

खासदार अनुप धोत्रेंच्या प्रयत्नांना यश – अकोल्यातून राष्ट्रीय एकात्मतेला गती

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला – अकोला रेल्वे स्थानकावरून अकोटकडे जाणाऱ्या पुलास तात्विक मान्यता मिळाल्यानंतर, खासदार अनुप धोत्रे यांनी आणखी एक मोठा यश मिळवले आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या पाच राज्यांना जोडणारी ‘हैदराबाद ते भगत की कोठी’ ही रेल्वे आता नियमित करण्यात आली आहे.

या गाडीमुळे रामदेव बाबा, अजमेर, पुष्कर, महाकाल (उज्जैन), ओंकारेश्वर, नाकोडा, तसेच हिंदू व मुस्लिम समाजातील विविध तीर्थस्थळांना जाणाऱ्या प्रवाशांना सुविधा होणार आहे. जैन समाजाचे तीर्थस्थान तसेच सालासर बालाजी, श्याम खाटू, राणी सती धाम येथे जाणाऱ्यांसाठीही ही गाडी उपयुक्त ठरणार आहे.

दक्षिण मध्य रेल्वेने ही गाडी नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. या मागणीसाठी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या नेतृत्वाखाली २५ खासदारांनी पाठपुरावा केला होता.

या प्रयत्नांमध्ये खासदार अनुप धोत्रे यांचा मोलाचा वाटा होता.खासदार धोत्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचे आभार मानले.

ही गाडी राष्ट्रीय एकात्मता, तीर्थयात्रा आणि अप्रवासी राजस्थानी नागरिकांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!