Join WhatsApp group

शिवभोजन केंद्र चालकांवर उपासमारीची वेळ – नोव्हेंबर २०२४ पासून अनुदान बंद

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : दिनांक ४ जुलै २५: राज्य शासनाची शिवभोजन योजना ही गरीब, श्रमिक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांसाठी दिलासा देणारी लोककल्याणकारी योजना आहे. या योजनेंतर्गत रोजच्या गरिबांच्या एक वेळच्या जेवणाची जबाबदारी उचलणाऱ्या शिवभोजन केंद्र चालकांवर मात्र सध्या उपासमारीची वेळ ओढवली आहे.

नोव्हेंबर २०२४ पासून आजपर्यंत अनुदानाची रक्कम शासनाकडून प्राप्त झालेली नाही. त्यामुळे चालकांना स्वखर्चातूनच सिलेंडर, भाजीपाला, किराणा, मजुरी, वीजबिल, दुकान भाडे अशा दैनंदिन खर्चांची उचल करावी लागत आहे. अनेक चालक कर्जबाजारी झाले असून, त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ लागली आहे.

अनेक शिवभोजन चालक आजही सेवा भावनेने केंद्र चालवत आहेत. मात्र, शासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांचे मानसिक व आर्थिक खच्चीकरण होत आहे. गरीबांना भरपेट जेवण देणाऱ्या या चालकांची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, स्वतःच उपाशी राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

शिवभोजन चालकांची मागणी आहे की, शासनाने त्वरित थकीत अनुदान वितरित करावे आणि भविष्यात नियमितपणे निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच, या प्रकरणाकडे कोणत्यातरी लोकप्रतिनिधीने विधानसभेत लक्ष घालावे किंवा प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी शिवभोजन केंद्र संचालक करत आहेत.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!