Join WhatsApp group

पंढरपुर साठी विशेष ट्रेन सुरु करा : सासंद धोत्रे

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक 17 जून 25: अकोला :अकोला पंढरपूर विशेष ट्रेन आषाढी एकादशी निमित्त सुरू करावी अशी मागणी दक्षिण मध्य रेल्वे व मध्य रेल्वे यांच्याकडे खासदार अनुप धोत्रे यांनी केली आहे.

नागपूर पंढरपूर, अमरावती पंढरपूर खामगाव पंढरपूर या गाड्या मध्य रेल्वेने सुरू केल्या असून येणे जाणे सात गाड्या पंढरपूर साठी सुरू झाल्या आहेत परंतु गेल्या वर्षांपूर्वी आपल्या मागणीची दखल घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने अकोला वाशिम बार्शी टाकळी कडे वारकऱ्यांसाठी पंढरपूर विशेष ट्रेन दोन गाड्या सोडल्या होत्या त्याच धर्तीवर यंदा सुद्धा गाड्या सुरू करण्यात याव्या अशी मागणी मुख्य प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे यांच्याकडे खासदार अनुभव धोत्रे यांनी केली आहे तसेच या संदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सुद्धा राज्यभरातून पंढरपूर साठी विशेष ट्रेन सोडून भावी भक्तांना सुविधा दिल्या आहेत.

याच धरतीवर अकोल्यावरून पंढरपूर दोन गाड्या सुरू कराव्या अशी मागणी खासदार धोत्रे यांनी केली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!