Join WhatsApp group

होळी निमित्त जालना ते पटना आणि काचीगुडा ते मदार जंक्शन (अजमेर) विशेष गाड्या धावणार

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक ०३ : अकोला :दक्षिण मध्य रेल्वे ने होळी निमित्त जालना ते पटना दरम्यान विशेष गाडीच्या सहा फेऱ्या करण्याचे ठरविले आहे तसेच काचीगुडा ते मदार जंक्शन (अजमेर जवळ ) विशेष गाडीच्या चार फेऱ्या करण्याचे ठरविले आहे.

गाडी संख्या 07611 जालना ते पटना विशेष गाडी : हि गाडी जालना येथून दिनांक 06, 10 आणि 15 मार्च 2025 ला रात्री 22.00 वाजता सुटेल आणि परतूर , सेलू , मानवत रोड , परभणी, पूर्णा , बसमत , हिंगोली, वाशीम, अकोला , शेगाव, मलकापूर, बुऱ्हानपूर, खांडवा, जुझार्पूर, इटारसी, पिपरिया , नरसिंघपूर, मदन महल, कटनी, मल्हार , सतना, मानिकपूर, प्रयागराज चावकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर , अरा, दानापूर मार्गे पटना येथे तिसर्‍या दिवशी सकाळी 09:45 वाजता पोहोचेल.

तसेच गाडी संख्या 07612 पटना ते जालना विशेष गाडी : हि गाडी पटना येथून दिनांक 08, 12 आणि 17 मार्च 2025 ला दुपारी 15.45 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच जालना येथे तिसर्‍या दिवशी सकाळी 02:35 वाजता पोहोचेल.

गाडी संख्या 07701 काचीगुडा ते मदार विशेष गाडी काचीगुडा येथून दिनांक 11 आणि 16 मार्च 2025 ला रात्री 23:30 वाजता सुटेल आणि मल्काजगिरी , मेद्चाल, कामारेद्दी, निझामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा , बसमत , हिंगोली, वाशिम, अकोला , शेगाव, मलकापूर, बऱ्हाणपूर, खांडवा , इटारसी, राणी कमलापती, संत हिर्दाराम नगर, सेहोर, उज्जैन, रतलाम, जोरा, मंद्सोर, नीमच, चीत्तौरगढ, , चान्देरिया, भिल्वारा, बिजैनगर, नासिराबाद, अजमेर मार्गे मदार येथे तिसर्‍या दिवशी दुपारी 12:30 वाजता पोहोचेल.

गाडी संख्या 07702 मदार ते काचीगुडा विशेष गाडी मदार येथून दिनांक 13 आणि 18 मार्च रोजी दुपारी 16.05 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच काचीगुडा येथे तिसर्‍या दिवशी सकाळी 04:00 वाजता पोहोचेल.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!