Join WhatsApp group

पीकेवी मध्ये प्रकल्पग्रस्त साठी विशेष मुहिम

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक २१ – अकोला – भुमिपुत्रांना न्याय देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या आस्थापनेवरील, प्रकल्पग्रस्त रोजंदारी तत्वावरील कर्मचाऱ्यांना प्रकल्पग्रस्तांकरिताच्या विशेष भरती मोहिमे अंतर्गत उच्चतम वयोमर्यादेत शिथिलता देण्यात यावी याकरिता आमदार रणधीर सावरकरांनी केलेल्या प्रयत्नांना यश….

डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोलाच्या आस्थापनेवरील, प्रकल्पग्रस्त रोजंदारी तत्वावरील कर्मचाऱ्यांना प्रकल्पग्रस्तांकरिताच्या विशेष भरती मोहिमे अंतर्गत उच्चतम वयोमर्यादेत शिथिलता देण्यात यावी याकरिता आमदार रणधीर सावरकरांनी शासनाकडे मागणी केली होती, सदरील मागणी व पाठपुराव्याचे अनुशंगाने राज्य मंत्रिमंडळाच्या दि.१०.१०.२०२४ रोजी संपन्न झालेल्या बैठकीत विषयावर प्राप्त झालेल्या मान्यतेस अनुसरून वयोमर्यादा शिथिल करण्या बाबतीत शासनाने आदेश निर्गमित केला आहे,

राज्यातील कृषि विद्यापीठांतील, गट-क व गट-ड संवर्गातील रिक्त पदे त्याच कृषि विद्यापिठाने बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्याकरिता, विशेष भरती प्रक्रिया राबविण्यास एक विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली., एकूण भरावयाच्या पदांपैकी ५० टक्के पदे ही त्याच कृषि विद्यापीठांतर्गत बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांकरिता राखीव ठेवण्यात यावीत. तसेच ज्या प्रकल्पग्रस्तांनी प्रत्यक्षात संबंधित कृषि विद्यापीठाकरिता जमिनी दिल्या असतील, तेच प्रकल्पग्रस्त सदर विशेष भरती मोहिमेकरिता पात्र असतील. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथील गट क व गट ड मधील प्रकल्पग्रस्तांमधून भरावयाच्या पदांकरिता भरती प्रक्रियेच्या जाहिराती डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांचेकडून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सदर जाहिरातींमध्ये प्रकल्पग्रस्तांकरिता कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष इतकी विहित करण्यात आली आहे.होती मात्र डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला च्या क्षेत्रांवर काम करणारे प्रकल्पग्रस्त रोजंदारी मजूर हे, गेल्या २० वर्षापासुन रोजंदारीवर कार्यरत आहेत.

परिणामी, त्यांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली असल्याने, वयाधिक्यामुळे ते भरती प्रक्रियेत भाग घेण्यास पात्र ठरत नाहीत, यास्तव, अशा मजुरांना प्रकल्पग्रस्तांच्या विशेष भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कमाल वयोमर्यादेत शिथीलता देण्याबाबत कर्मचारी संघटनेने आमदार रणधीर सावरकरांना दिले होते, आमदार रणधीर सावरकर हे डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारिणी चे सदस्य आहेत ,सदरील निवेदनानुसार, शासनाकडे पाठपुरावा करून सदर प्रस्तावास प्राप्त झालेल्या शासनमान्यतेनुसार, शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे,

सदरील शासन निर्यणयानुसार डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला च्या आस्थापनेवर प्रदीर्घ काळ रोजंदारी तत्यावर कार्यरत असलेल्या प्रकल्पग्रस्त मजुरांकरिता, विद्यापीठाकडून संदर्भाधीन शासन निर्णयानुसार राबविण्यात येत असलेल्या लक्ष प्रकल्पग्रस्तांकरिताच्या विशेष भरती मोहिमे अंतर्गत उच्चतम वयोमर्यादेची अट शिथील करण्यात आली आहे, त्यामुळे भूमिपुत्रांना न्याय मिळाला आहे.


शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी व ग्रामीण प्रश्नासाठी सातत्याने संघर्ष करणारे पाठपुरावा करणारे आमदार सावरकर यांनी भूमिपुत्रांना न्याय मिळवून देऊ ग्रामीण अर्थव्यवस्था सोबत शेतकरी प्रकल्पग्रस्त न्याय मिळवून दिला आहे.
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कर्मचारी संघाने आमदार रणधीर सावरकरांप्रति आभार व्यक्त केले,. तसेच अनेक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आमदार सावरकर यांचे आभार व्यक्त केले आहे


Share

Leave a Comment

error: Content is protected !!