Join WhatsApp group

श्री गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था यांचे मानवतेचे सामाजिक कार्य

Photo of author

By Sarkarmzanews

Share

आमदार हरीश पिंपळे यांचा अध्यक्षतेतील श्री गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था, मुर्तिजापूर यांच्या माध्यमातून एक सामाजिक कर्तव्य पार पाडण्यात आले.

दिनांक १७/०६/२०२५ मंगळवार रोजी मुर्तिजापूर रेल्वे स्थानकावर एक मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच संस्थेचे कार्यकर्ते बादशाह उर्फ श्री.निलेश वानखेडे व सेनापती उर्फ श्री.दीपक शेवतकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व पोलीस प्रशासनाच्या मदतीने संपूर्ण जबाबदारीने मृतदेह मुर्तिजापूर शासकीय रुग्णालयात पोहोचविला.

सदर मृतदेहाचे ओळख पटविण्याचा व त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन पोस्टमार्टम करुन अंत्यविधी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!