Join Whatsapp

निवडणुका जवळ आल्या प्रसार माध्यमांना आपल्या कडे ओडण्याची होड

Photo of author

By Sir

Share

न्यूज डेस्क – जश्या जश्या निवडणुका जवळ येत आहे तश्या तश्या अनेक शक्कल लळवताना भावी उमेदवार आजकाल दिसत आहे.

प्रसारमाध्यमांना सगळे चित्र स्पष्ट माहीत असतात कारण ते शनिक स्थानिक असल्यामुळें त्यांचे लोकल कॉन्टॅक्ट सुत्रव त्यांचा बातम्या अगदी परफेक्ट असतात. पण कार्यकरता व स्थानिक प्रसार माध्यमांची लोक जेव्हा पर्यंत पक्षा कडून तिकीट घोषित होत नाही तेव्हा पर्यंत संयम बाळगून असतात.

जसेच तिकीट उमेदवारांना मिळाले तसेच कार्यकर्ते व प्रसार माध्यम झपाट्याने कामाला लागतात.

पण मात्र सध्या भावी उमेदवार एवढे हुशार झाले आहे आपल्या मार्केटिंग साठी काही बाहेरील यूट्यूब चॅनल वाले मतदार संघात आणून काही आपल्या जवळचा लोकांना तज्ञ म्हणून तेथे बसवितात व तो कार्यक्रम अगदी परफेक्टली मेनेज पद्धतीने चालतो.

तसेच मतदार संघाला काय समस्या आहे ? शेतकऱ्यांचे काय मुद्दे आहे ? वर्षांनुवर्षे ज्या समस्यांचा कधी समाधान झालं नाही सरकार कोणताही असो अश्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते व जनतेला अक्षरशः मूर्ख बनविण्याचे हे अरेंज शो सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या खूप पाहायला मिळत आहे.

नंतर या कार्यक्रमाची लिंक, व्हिडिओ, शॉर्ट क्लिप हे व्हॉट्स ॲप ग्रुप वर फेसबुक वर पाठवून संभ्रम निर्माण करण्याचे काम खुप मोठ्या प्रमाणावर दिसत आहे.

तरी मतदारराजा भावी उमेदवारांन पेक्षा खूप हुशार आहे हे मात्र उमेदवाराने विसरू नये. असे अनेक किस्से मतदार संघात पहावयास मिळत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!