Join WhatsApp group

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड व त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा साठी शिवसेना तर्फे आंदोलन

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक ०५ : अकोला: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड व त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी शिवसेना केंद्रीय मंत्री मा.खासदार प्रतापराव जाधव साहेब व जिल्हा संपर्कप्रमुख गोपीकिशनजी बाजोरिया साहेब यांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांच्या नेतृत्वामध्ये अकोला जिल्हा शिवसेनेतर्फे आज दिनांक ५ मार्च २०२५ रोजी शहीद मदनलाल धिंग्रा चौक बस स्टॅन्ड जवळ आंदोलन करण्यात आले.

यावेळी हत्येतील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्या पुतळ्याला अकोला बस स्टँड जवळील शहीद मदनलाल धिंग्रा चौक येथील उड्डाणपूला फाशी देऊन वाल्मीक कराडला फाशी द्या अश्या घोषना देण्यात आल्या व शासनाकडे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी वाल्मीक कराड व त्याच्या साथीदाराला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. आंदोलनावेळी शिवसेना शहर प्रमुख रमेश गायकवाड, नगरसेवक शशी चोपडे, शहर संघटक सागर पुर्णेये, अकोला पश्चिम विधानसभा प्रमुख राजेश दांडेकर, रवी भामरे, बार्शीटाकळी उपतालुकाप्रमुख सुरेश पाटील, अविनाश मोरे, उपशहर प्रमुख नितीन बदरखे, आकाश दलाल, प्रतीक मानेकर, दीपक पानझडे, शिवम पुरोहित, प्रदीप काशीद, विभाग प्रमुख गोलू गावंडे, योगेश वाव्हाळ, वैद्यकीय समन्वयक नागेश इंगोले, रमेश सोनारगन, गजानन नवथळे, मनोज अग्निहोत्री, रवी बडे, प्रदीप शिंदे, बाबुराव कुटे, सोनू पाटील, विजय प्रधान, राजू नारखडे, सौरभ डहाके, सागर वाघमारे, भानुदास गोंधळेकर, चेतन जैन, वैभव बोरचाटे, तुषार चतार, गौरव पाटणे, विठ्ठल काळदाते, अमोल पाटील, निलेश भोसले, नितीन गंगलवार, संदेश काजळकर यासह शेकडो शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!