Join Whatsapp

सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल

Photo of author

By Sir

Share

मुर्तिजापूर तालुका प्रतिनिधी – सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे सध्या मुर्तिजापूर तालुक्यात सोयाबीन सोंगणे सुरू आहे अनेक गावांतील शेतकऱ्यांनी सांगितले आहे की जून च्या २४ ,२५ तारखेनुसार सोयाबीन पिकाची पेरणी केली , तेव्हापासून आजपर्यंत लागवडी खर्च खूप मोठ्या प्रमाणात झाला एकरी २०,२५ हजार रुपये खर्च झाला व उत्पन्न एकरी २ ते ३ क्विंटल होत आहे व सोयाबीनचे बाजारातील भाव ३५०० ते ४००० रूपयापर्यंत बाजारात विक्री होत आहे.

त्यामुळे २० ते २५ हजार रुपये खर्च एकरी झाल्यावर उत्पन्न १२ ते १५ हजार रुपये हाती येत आहे अशा परिस्थितीत सोयाबीनची शेती परवडणारी आहे का ? उत्पन्नात घट आल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे,

अशा परिस्थितीत दिवाळी सण जवळ आलेला आहे पुन्हा हरभरा गहू पिकाची रब्बीची पेरणी करण्यासाठी पैशाची गरज आहे शेतकरी खूप संकटात सापडलेला आहे शासनाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये हेक्टरी मदत करावी, शेतकऱ्यांचे संपूर्ण पीकं कर्ज माफ करावे अशी एक मुखी मागणी शेतकरी मोठ्या प्रमाणावर करीत आहे.

शेतकरी आपले पीक उभं करण्यासाठी पीक कर्ज घेतो, उसनवारी करतो सावकारा कडून पैसे घेतो अशा परिस्थितीत शेती कशी परवडणार आहे, शेतकरी आत्महत्या वाढण्यामागचे हे प्रमुख कारण आहे. शेतातील कृषी निविष्ठाची किंमत खूप महाग झाली सोयाबीन बॅग ४००० रुपये, खते महाग झाली, कीटकनाशक महाग झाले, मजुरांच्या टंचाईमुळे सोयाबीन सोगंणी ३००० रुपये मजूर घेत आहे व इतरही खर्च खूप आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदार आहे

.प्रतिक्रिया:- २५ जूनला शेतात सोयाबीनची पेरणी केली ४००० रुपये बॅग प्रमाणे बियाणे विकत घेतले ,पेरणी पासून तर आज रोजी सोंगणी पर्यंत एकरी २० ते २५ हजार रुपये सोयाबीन पिकावर खर्च झाला, सोयाबीन काढल्यानंतर एकरी २ ते ३ क्विंटल उतारा आहे, खर्च जास्त उत्पादन कमी. अशा परिस्थितीत शेतकरी शेती करावी की कुटुंबाचे पालन पोषण, मुलांचे शिक्षण व रब्बी पिकासाठी पैसे कसे जमा करावे हा प्रश्न आहे.

अरविंदराव गाडवे.शेतकरी खिनखिनी.

प्रतिक्रिया – पेरणी करून तीन ते चार महिन्यात सोयाबीन पिकावर भरपूर खर्च आला. मात्र सोयाबीन सोंगणीनंतर उत्पादन एकरात २ ते ३ किव्टंल झाल्याने झालेला खर्च निघाला नाही, मजुराला व मशीनवाल्यांना जवळचे पैसे द्यायचे काम पडले, पुढील शेतीच्या मशागत या खर्च व दिवाळी, घर खर्च कसा करावा यासाठी शासनाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तात्काळ अनुदान द्यावे.

अनील लाखे.शेतकरी गाजीपूर.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!