Join WhatsApp group

बियाणांची फसवणूक : महाबीज व बुस्टर कंपनीने पण केली फसणूक? बळीराजाला पुन्हा पेरणीची वेळ, कंपनी विरोधात ग्राहक मंचात जाण्याची तयारी

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर ३ जुलै २५ : प्रेमराज शर्मा

मूर्तिजापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात बुस्टर कंपनी आणि महाबीजचे “फुले संगम” या वाणाचे सोयाबीन बियाणे पेरले. मात्र, अनेक ठिकाणी हे बियाणे अजूनही उगवलेले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली होती. मात्र, आता हे पीक पुन्हा पेरण्याची वेळ ओढवली आहे. प्रशासनाकडे तक्रार करूनही फक्त थातूर-मातूर पंचनामे झाले, आणि अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. दुसरीकडे बियाणे कंपनीच्या प्रतिनिधींनी विक्री करून फायदा मिळवला, तर शेतकरी मात्र पुन्हा अडचणीत आलेला आहे.

“शेतकरी त्रस्त, कंपनी मस्त!”
या प्रकरणामुळे बळीराजात प्रचंड संताप आहे. बियाणे निकृष्ट असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अनेकांनी आता संबंधित कंपन्यांविरोधात ग्राहक संरक्षण मंचात दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे. काही शेतकरी म्हणतात की, “आता न्याय मिळाला नाही तर आत्महत्या हा एकच पर्याय राहील…”

प्रशासन आणि सरकारने लक्ष घालावे
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे आणि कृषी विभागाकडे तात्काळ चौकशी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशीही जोरदार मागणी होत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!