Join Whatsapp

अमरावती विभागीय शालेय हॉलिबॉल क्रीडा स्पर्धेला सुरुवातात. 17 वर्ष मुलांच्या वयोगटात न्यू इंग्लिश हायस्कूलचा संघ राज्यस्तरावर

Photo of author

By Sir

Share

अकोला – क्रीडा व युवक सेवा संचालनालाय म.रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमरावती विभागीय हॉलिबॉल 17 वर्ष मुले /मुली व 14 वर्ष मुले /मुली यांच्या करण्यात आले.

अमरावती विभागातून एकूण 14 संघांनी सहभाग नोंदविला.17 वर्ष मुलांच्या वयोगटात अकोला मनपा (न्यू इंग्लिश हायस्कूल) संघ विजयी होऊन राज्यस्तरीय हॉलिबॉल स्पर्धेत प्रवेश मिळविला. तसेच मुलींच्या वयोगटात यवतमाळ (एस. पी. एम. विद्यालय व कनिष्ठ महा. वणी) संघ विजयी होऊन राज्यस्तरीय हॉलिबॉल स्पर्धेस पात्र ठरला.

तसेच मुलांच्या वयोगटातील उपविजयी संघ यवतमाळ ठरला तर तृतीय स्थान अमरावती मनपा संघाला मिळाले. याचप्रमाणे मुलींच्या वयोगटातील उपविजयी संघ बुलढाणा संघ ठरला तर तृतीय स्थानावर अमरावती ग्रामीण संघ राहिला.

स्पर्धेचे उदघाट्न जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. सतीशचंद्र भट्ट यांनी केले तर उदघाट्नच्या वेळी राक्रीमा राहुल निवडुंगे (अमरावती ),उदय हातवळणे, श्री गावंडे, संतोष गजभिये, श्री गुलाब राठोड (बुलढाणा )श्री. चौहान उपस्थित होते. स्पर्धेत पंच म्हणून श्री. प्रमोद पाटील, वैभव देहलिवाले, सचिन निलगिरे, निशांत वानखडे, अभिजित गोमासे,विक्की पवार, अभिलाष बडगे, नितेश वासनिक, कार्तिक वानखडे,कृष्णा सराफी,संतोष धामणे, इत्यादीनी पंच म्हणून काम पाहिले. उद्या दि. 01/10/2024 ला 14 वर्ष मुला-मुलींची विभागीय स्पर्धा राहतील.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा संयोजक क्रीडा अधिकारी श्रीमती मनीषा ठाकरे,सुरजकुमार दुबे, अमर जाधव, श्रीमती नलिनी जाधव, जिल्हा संघटक राजेश गावंडे, राजू उगवेकर हे परिश्रम घेत आहेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट्ट कळवितात.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!