Join WhatsApp group

पेट्रोल पंपावर दोन आरोपींकडून सरपंचाला मारहाण

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर (दिनांक : १३) – तालुक्यातील बुब पेट्रोलपंपावर किरकोळ कारणावरून एका तरुणाला दोन आरोपींनी संगनमत करून मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली असून, रात्री अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादी प्रदीप दिलीपराव फुके (वय 28, व्यवसाय शेती, रा. निंबा, ता. मुर्तीजापूर) हे आपल्या मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरण्यासाठी बुब पेट्रोलपंपावर रांगेत उभे होते.

दरम्यान, आरोपी वसीम (वय 25) व इमरान (वय 27, दोन्ही रा. रामखेडा, ता. मुर्तीजापूर) यांनी पेट्रोल भरण्याच्या वेळी फिर्यादीच्या मोटारसायकलला धक्का दिला.फिर्यादीने समजावून सांगितल्यावर आरोपींनी संगनमत करून थपडा व बुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच गाडीवरील लोखंडी की-चेन डोळ्याच्या भुवईवर मारून जखमी केले. शिवीगाळ करून “पुन्हा भेटलास तर मारून टाकू” अशी धमकी दिली.फिर्यादीच्या जबानी व डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे मुर्तीजापूर पोलिसांनी अप. क्र. 393/2025, कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5) भा.दं.सं. प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

दाखल अधिकारी म्हणून महिला पोलीस हवालदार शालिनी सोळके (ब.नं. 2121) यांनी गुन्हा नोंदविला असून, तपास पोलीस हवालदार इरफान हंख (ब.नं. 1336) यांच्याकडे आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!