Join WhatsApp group

मुर्तीजापुर शहरातील भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करून नसबंदी सह सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करा संदीप जळमकर यांनी नगरपरिषद ला निवेदन दिले

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर – दिनांक २९ ऑगस्ट २५: शहरात वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या त्रासामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अनेक तक्रारी नगर परिषदेकडे प्राप्त झाल्या असून, अद्यापही योग्य तो उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी फिरणे बंद केले आहे, तर शाळेत पायदळ जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तत्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.

२२ ऑगस्ट २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत:

मोकाट कुत्र्यांचे लसीकरण, नसबंदी (निबर्बीज), डिवॉर्मिंग करून मूळ क्षेत्रात परत सोडणे.

रॅबीजग्रस्त किंवा आक्रमक कुत्र्यांना शेल्टरमध्ये ठेवणे.

प्रत्येक नगरपालिकेत फीडिंग झोन तयार करणे व सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना अन्न देण्यास बंदी.

अंमलबजावणीत अडथळा आणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई.

प्राणीप्रेमी व NGOs यांना कोर्टीनुसार आर्थिक सहभाग अनिवार्य.

संदीप जळमकर नगर परिषदेला आवाहन केले आहे की, शहरातील सर्व मोकाट कुत्र्यांची गणना करून त्यांना बिल्ला लावणे, लसीकरण व नसबंदी करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी. तसेच सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सात दिवसांच्या आत अंमलबजावणी व्हावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!