Join WhatsApp group

“नियम धाब्यावर, काम बेफिकीर — ठेकेदार अग्रवाल वर IPC 304-A दाखल करा : ग्रामीण नागरिकांची जोरदार मागणी”

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापुर : दिनांक ३० : मुर्तीजापुर ते हिवरा कोरडे या मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेशी सरळ खेळ केला जात असल्याचे गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहेत. रस्त्यावरील बेफिकीर काम, मूलभूत सुरक्षिततेचे अभाव आणि वाहतूक व्यवस्थेचे पूर्णतः दुर्लक्ष यामुळे मागील दोन महिन्यांत तब्बल १५ ते २० अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

काल रात्री झालेल्या भीषण अपघातात उज्वल चव्हाण या तरुणाचा मृत्यू झाला. तर आज सकाळी हिरपूरजवळ स्कूटीवरून जाणाऱ्या एका महिलेलाही अपघाताचा सामना करावा लागला. या सलग अपघातांमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

नियमांकडे ठेकेदाराचा दुर्लक्ष — नागरिकांचा आरोप

अग्रवाल नावाच्या ठेकेदाराकडून रस्त्याचे काम अत्यंत निष्काळजीपणे केले जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
काम सुरू असताना साईन बोर्ड, चेतावणी चिन्हे, रात्री रिफ्लेक्टर किंवा लाईट्स न लावणे, तसेच वाहतूक नियंत्रकांची अनुपस्थिती हे गंभीर आरोप करण्यात येत आहेत.

रस्ता बांधकाम नियमांनुसार –

  • काम सुरू असताना सुरक्षित वाहतूक व्यवस्थेची तरतूद करणे बंधनकारक
  • रात्री पुरेसे चेतावणी दिवे, सिग्नल व प्रकाशव्यवस्था ठेवणे आवश्यक
  • अपघात झाल्यास ठेकेदाराची जबाबदारी निश्चित

मात्र या सर्व नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन होत असल्याने ठेकेदारावरील निष्काळजीपणाचा आरोप अधिक गंभीर ठरत आहे.

IPC 304-A अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

नागरिकांनी अग्रवाल ठेकेदाराविरुद्ध

  • निष्काळजीपणामुळे मृत्यू (IPC 304-A)
  • सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणे

या गुन्ह्यांनुसार तात्काळ FIR नोंदवावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा — नागरिकांची भूमिका

घटनेचे गांभीर्य पाहता,

  • रस्त्याचे दर्जेदार तपासणी,
  • कामातील त्रुटींची चौकशी,
  • नियमभंगाबद्दल ठेकेदारावर कठोर कारवाई

याची मागणी नागरिक निर्धाराने करत आहेत.

अपघातांची वाढती मालिका, मृत्यू आणि जखमी झालेल्या नागरिकांची स्थिती पाहता प्रशासनाने यावर तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!