Join WhatsApp group

Ads

राष्ट्रीय रग्बीसाठी अकोल्यात रणधुमाळी; 17 वर्षांअंतर्गत खेळाडूंची तयारी जोमात – कलिंगा स्टेडियमकडे खेळाडूंची नजर

By Sarkar Maza

April 1, 2026 1:58 pm

Ads

अकोला, : अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेसाठी पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आले असून, जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचे रग्बी प्रशिक्षण शिबिर भरविण्यात येत आहे.


अहिल्यानगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय रग्बी स्पर्धेतून 17 वर्षाखालील मुला-मुलींची निवड करण्यात आली होती. या निवडलेल्या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेसाठी सक्षम बनविण्याच्या उद्देशाने अकोल्यात हे विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.


रग्बी हा वेग, ताकद आणि संघभावना यांचा संगम असलेला खेळ आहे. या खेळात चेंडू पुढे नेण्यासाठी पास मागे दिला जातो, तर टॅकलिंगद्वारे प्रतिस्पर्ध्याला रोखले जाते. शालेय स्तरावर प्रामुख्याने ‘रग्बी सेव्हन्स (7s)’ प्रकार खेळला जातो, ज्यामध्ये प्रत्येकी 7 खेळाडूंचा संघ आणि कमी वेळेचे सामने असतात, त्यामुळे खेळ अधिक जलद आणि रोमांचक होतो. याउलट ‘रग्बी 15s’ मध्ये 15 खेळाडूंचा संघ आणि अधिक कालावधीचे सामने खेळले जातात. अशा प्रशिक्षण शिबिरांमुळे खेळाडूंमध्ये तांत्रिक कौशल्य, फिटनेस आणि रणनीती विकसित होण्यास मदत होते.


या शिबिरासाठी तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षण पार पाडण्यासाठी रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मार्फत प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जात आहे. मुंबईचे अनुभवी प्रशिक्षक महेश राठोड मार्गदर्शन करत असून, महाराष्ट्रातील विविध भागांतून 17 वर्षाखालील मुला-मुली मोठ्या संख्येने प्रशिक्षणासाठी सहभागी झाले आहेत.


शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश भट, क्रीडा अधिकारी राजेश गावंडे, निशांत वानखडे तसेच सर्व क्रीडा अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. यावेळी अकोला जिल्हा रग्बी असोसिएशनचे अध्यक्ष प्रेमराज शर्मा, सचिव ज्ञानेश्वर टाले, सहसचिव अमित मनवर यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन पार पडले.


दरम्यान, या प्रशिक्षणानंतर दोन्ही संघ 4 एप्रिल 2026 रोजी ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर होणाऱ्या राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेत सहभागी होणार आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!