Join WhatsApp group

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोशॅलिस्ट पत्रकार परिषद

Photo of author

By Sarkarmzanews

Share

न्युज डेस्क – अमरावती – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोशॅलिस्ट च्या वतीने दिनांक 30 ऑक्टोंबर बुधवार रोजी पत्रकार भवन वालकट कंपाउंड अमरावती येथे पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेत राज्याच्या विधानसभा निवडणुकी संदर्भात आर पी आय सोशालिस्ट चे पदाधिकारी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

राज्यात आरपीआय सोशालिस्ट पक्षाने मित्र पक्ष देश जनहित पार्टीचे अकोला जिल्हाध्यक्ष किशोर ज्ञानेश्वर तायडे 032 मूर्तिजापूर विधानसभा येथील उमेदवार तसेच 07अमरावती लोकसभा निवडणूक लढलेले उमेदवार 2024 यांना जाहीर बिनशर्त पाठिंबा दिला आहे आणि काही मित्रपक्ष यांना घेऊन आपले समर्थित 16 उमेदवार उभे केले आहे.

अमरावती जिल्ह्यात सर्व आठ विधानसभा जागेवर जनतेसाठी काम करणारे उमेदवाराला आरपीआय सोशॅलिस्ट आपला समर्थन 6 नवंबर रोजी देणार आहे असल्याची माहिती पक्ष अध्यक्ष माननीय भाऊराव वानखडे यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला संबोधित पक्ष अध्यक्ष माननीय भाऊराव वानखडे प्रदेश नेते एडवोकेट बी आर वाकोडे प्रदेश अध्यक्ष सौ लताताई बागडे प्रदेश प्रवक्ता जितुभाऊ खान विदर्भ महासचिव सौ मंदाताई राऊत विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद राजीक यांनी संबंधित केले. या पत्रकार परिषदेला उपस्थित विदर्भ सचिव गजानन भाऊ बनसोड

विदर्भ महासचिव अल्पसंख्यांक सेल सय्यद इब्राहिम विदर्भ महासचिव महिला आघाडी नसीम अख्तर अमरावती जिल्हा अध्यक्ष राजकुमार जी खंडारे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ संगीता ताई शेगोकार विदर्भ युवक महासचिव माननीय बबलूभाऊ बडनेरा शहराध्यक्ष लक्ष्मीताई वासनिक अमरावती शहराध्यक्ष घनश्याम जी लेंडे तसेच देश जनहित पार्टीचे अकोला जिल्हाध्यक्ष किशोर ज्ञानेश्वर तायडे हे उपस्थित होते.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!