Join WhatsApp group

रॉयल ढाबा की रॉयल पेट्रोल पंप? टँकर खाली करण्याच्या अवैध व्यवहाराने बोरगांव मंजुचे ठाणेदार अनिल गोपाल यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापुर : दिनांक ०५ : बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या रॉयल ढाब्यावर दिवसाढवळ्या पेट्रोल-डिझेलचे टँकर खाली करण्यात येत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. ढाब्याचे नाव असले तरी प्रत्यक्षात येथे मोठ्या प्रमाणात पेट्रोल–डिझेलची इंधनाची अवैधरीत्या होणारी चोरी सुरू असल्याचे स्थानिक पातळीवर चर्चेला ऊत आला आहे. ढाब्याच्या समोरच कोळंबी गाव असल्याने येथील ग्रामस्थांना सातत्याने धोका निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुप्पट नफ्यासाठी टँकरमधील इंधन ढाब्या मागील बाजूला उतरवून ट्रक-टँकरची सर्रासपणे देवाणघेवाण केली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया महामार्गाच्या अगदी कडेला सुरू असल्याने स्फोटाचा किंवा आगीचा कोणताही अपघात घडल्यास त्याचा फटका थेट महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना तसेच कोळंबी आणि परिसरातील गावकऱ्यांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, अशा प्रकारचा धोकादायक आणि मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला पेट्रोल-डिझेलचा अवैध व्यवहार पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास कसा येत नाही, याबद्दल मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ठाणेदार अनिल गोपाल यांच्या भूमिकेबद्दल गावकऱ्यांमध्ये संशय निर्माण झाला असून एवढा मोठा इंधनाचा धंदा सुरू असताना कारवाई का होत नाही? अशी विचारणा होत आहे.

ग्रामस्थांनी तातडीने या प्रकाराची चौकशी करून ठोस कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा एखादी अप्रिय घटना घडल्यास जबाबदारी कोणाची ठरणार, असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

हि बातमी मागे सरकार माझा न्यूज ने प्रसारित केली असून त्या वेळेस स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली होती त्या नंतर परत या अवैध व्यवसायला कोणाचा आशीर्वाद मिळाला आहे?

(वरील फोटो – इंटरनेट नेट वरून घेतला आहे.)


Share

Leave a Comment

error: Content is protected !!