Join WhatsApp group

Ads

बायपासवरील दारू विक्रेत्याची भूमिका संशयात ! किनखेडमध्ये स्वस्त व बनावट दारूचा गोंधळ?

By Sarkar Maza

April 14, 2026 2:39 am

Ads

मुर्तीजापूर तालुक्यातील किनखेड गावात देशी व इंग्लिश दारू मुद्दल भावात विक्री होत असल्याच्या प्रकाराने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. बाजारभावापेक्षा कमी दरात दारू सहज उपलब्ध होत असल्याने ही दारू डुप्लिकेट तर नाही ना, असा गंभीर संशय गावकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

याच संदर्भात काही महिन्यांपूर्वी ‘सरकार माझा न्युज’ने संबंधित सुलताने व्यक्तीच्या नावावर डुप्लिकेट दारू विक्रीबाबत बातमी प्रकाशित केली होती.

त्यानंतर प्रशासनाने तात्पुरती कारवाई करत हा विषय मार्गी लावल्याचा दावा केला होता. मात्र, काही काळ शांततेनंतर पुन्हा त्याच प्रकाराला ऊत आल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

या संपूर्ण प्रकरणात संबंधित सुलताने यांच्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, वारंवार अशा प्रकारांमध्ये त्यांचे नाव समोर येणे ही केवळ योगायोगाची बाब आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नियमांची पायमल्ली करून मुद्दल भावात दारू विक्री होणे ही बाब साधी नसून, यामागे ठरवून रचलेले जाळे असल्याचा संशय अधिक बळावत आहे.

तसेच, मूर्तीजापुर बायपासवरील एका देशी दारू विक्रेत्याची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कमी दरातील दारूचा पुरवठा याच ठिकाणाहून होत असल्याच्या चर्चा रंगत असून, हा प्रकार केवळ विक्रीपुरता मर्यादित नसून संपूर्ण पुरवठा साखळीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.

अशा प्रकारे नियमांचे खुलेआम उल्लंघन करून व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई का होत नाही, असा रोषही व्यक्त होत आहे.

या सोबतच, एमआयडीसी परिसरात डुप्लिकेट दारूचा मोठा साठा गुप्तपणे ‘गोडाऊन’मध्ये ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. बायपास वरील एका देशी दारू विक्रेत्याशी संबंधित ठिकाणी हा साठा असल्याची चर्चा असून, स्थानिक पातळीवर याबाबत ठोस माहिती उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या संपूर्ण साखळीचा तपास करणे अत्यंत आवश्यक ठरत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!