Join WhatsApp group

अटक आरोपींचा ‘रोड शो’; एसपी अर्चित चांडक यांचा रुद्र अवतार – कृषी नगर गँगवॉर प्रकरण

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला, १८ जुलै – गुरुवारी रात्री कृषी नगर भागात दोन गटांमध्ये तलवार, लोखंडी रॉड आणि बंदुकांचा वापर करून झालेल्या सशस्त्र गँगवॉर प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत शुक्रवारी रात्री सात आरोपींना अटक केली. अटक आरोपींना घटनास्थळी ‘रोड शो’ करत जनतेपुढे उभं केलं गेलं आणि नागरिकांची माफी मागायला लावण्यात आलं.

घटनाक्रम:-

गुरुवारी सायंकाळी सुमारे सात वाजता कृषी नगरात दोन गटात सशस्त्र संघर्ष झाला. या गँगवॉरमध्ये तलवार, रॉड आणि बंदुकांचा वापर झाला आणि आठ जण किरकोळ जखमी झाले. घटनेनंतर दोन आयपीएस अधिकारी, सिव्हिल लाईन पोलिस, गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

पोलीस यंत्रणेची तात्काळ कारवाई :–

शुक्रवारी सिव्हिल लाईन पोलिसांनी आठ जणांना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे निरीक्षक मालती कायटे यांनी सांगितले.

‘भाई-दादांचा’ रोड शो — गुन्हेगारांना जनतेपुढे माफी मागायला लावलं

शुक्रवारी रात्री मोठ्या बंदोबस्तात पोलिसांनी अटक आरोपींना घटनास्थळी नेत ‘रोड शो’ केला. या वेळी आरोपींना परिसरातील नागरिकांची माफी मागायला लावण्यात आले आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सक्त इशारा देण्यात आला.

अटक करण्यात आलेले आरोपी

सतीश वानखडे

आकाश गवई

धम्मा वानखडे

शुभम हिवाळे

अंकुश क्षिरसागर

स्वप्नील बागडे

अनिकेत मल्हार

शंतनु तायडे

धम्मपाल तायडे

अनिकेत सावळे

कोणत्या कलमान्वये गुन्हे दाखल?

या प्रकरणात पुढील भारतीय दंड विधान, आर्म्स अ‍ॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत:

IPC कलम: 189(2), 190, 191, 296, 115(2), 118(1)(2), 109, 125, 352

आर्म्स अ‍ॅक्ट: 3/25, 4/25

महाराष्ट्र पोलीस कायदा: कलम 125

पोलीस अधिकारी घटनास्थळी

या कारवाईत जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय अधिकारी गजानन पडघन, तसेच निरीक्षक मालती कायटे, शिरीष खंडारे, शेख रहीम, नितीन लेव्हारकर, मनोज केदारे, धर्मा सोनूने, आणि इतर गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व राखीव दल सहभागी होते.

या कारवाईनंतर जनतेचा पोलिस व विभागावर अधिक विश्वास वाढला असून पोलीस अधीक्षक अर्चित चांडक हे भाई,दादा,पलान अशा गुन्हेगारी तत्वातील लोकांना येणारा काळात आळा घालतील असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!