Join WhatsApp group

वैद्यकीय आघाडीच्या मेळाव्यासाठी आढावा बैठक संपन्न

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला – आज दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी अकोला महानगर व जिल्हा ग्रामीण तर्फे आयोजित पश्चिम विदर्भ प्रांतीय वैद्यकीय आघाडी मेळाव्याच्या पूर्वतयारी व नियोजनासाठी आढावा बैठक घेण्यात आली.

सदर मेळावा २४ ऑगस्ट २०२५ (रविवार) रोजी सकाळी ११ वाजता मराठा मंडळ मंगल कार्यालय, अकोला येथे होणार आहे. या मेळाव्यास वैद्यकीय आघाडीचे मुख्य संरक्षक व भाजपा विधीमंडळ मुख्य प्रतोद आ. मा. रणधीरभाऊ सावरकर, राज्याचे कामगार मंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा. आकाशजी फुंडकर, अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. अनुपभाऊ धोत्रे, राज्यसभा खासदार मा. डॉ. अजितजी गोपछडे, तसेच वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाळासाहेब हरपाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

आढावा बैठकीस भाजपा राज्य परिषद सदस्य डॉ. किशोरजी मालोकार, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष डॉ. अमितजी कावरे, महानगर अध्यक्ष डॉ. राजू देशपांडे, डॉ. सुनील फोकमारे, डॉ. सतीश उटांगळे, डॉ. राजेंद्र वानखडे, डॉ. दिलीप अग्रवाल, डॉ. सुरेश सिवाल, डॉ. अनिल तोष्णीवाल, डॉ. कपिल लढ्ढा, डॉ. विजय शर्मा, डॉ. जयंत म्हैसने, डॉ. प्रवीण अग्रवाल, डॉ. सुजित फोकमारे, डॉ. तुषार माळोकार, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. सुनील जाधव, डॉ. सुनील मारवाल, डॉ. वैभव देशमुख, डॉ. अंतरिक्ष दोड, डॉ. रविंद्र तेलकर, डॉ. सुयोग जोहरापुरकर, डॉ. युवराज देशमुख, डॉ. नरेश गोंड, डॉ. अमोल केळकर, डॉ. निखिल बक्षी, डॉ. विक्रांत इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.या बैठकीत मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!