मूर्तिजापूर : उत्तर प्रदेश, कुशीनगर येथे २७,२८,२९ डिसेंबर ला तायक्वांडो संपन्न झाली.या स्पर्धेमध्ये चार स्वर्ण पदक,चार रजत पदक आणि चार कास्य पदक यामध्ये कु.विधी यादव,गोल्ड मेडल शुभम यादव,विराज नांदेकर,दुर्गेश प्रधान,सिल्वर मेडल हर्ष अग्रवाल अतुल येरडावरकर,मानस बाहेती,प्रज्ञा खंडारे,बॅच मेडल मध्ये कू. अनन्या कोथळकर,तन्मय सासनकर,श्रेयस शेगावकर,कू.गरीमा बांगड,हर्ष अग्रवाल,गौरीक धंदूकीया व यामध्ये १३ राज्यांनी सहभाग घेतला होता.
प्रथम क्रमांक उत्तम प्रदेश,द्वितीय क्रमांक गुजरात,तृतीय क्रमांक महाराष्ट्र याचे सर्व श्रेय सिटी तायक्वांडो क्लबचे प्रशिक्षक दिनेश श्रीवास,राज गुडले,भारती आमटे,प्रतीक यदवर,जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र जी भट्ट यांनी अभिनंदन केले.व विद्यार्थी मुर्तिजापूर मध्ये पोहचताच विद्यार्थ्यांच्या आई वडिलांनी त्यांचे स्वागत केले.
