Join Whatsapp

सावधान ! आपला समाज विकला जात आहे का ?

Photo of author

By Sir

Share

प्रेमराज शर्मा – राजकारण हे जास्तीत जास्त धर्माचा व समाजाचा अवतीभोवती फिरत असते, सध्या राज्यभर विधानसभा निवडणुकीची धूम सुरु आहे. प्रत्येक मतदार संघात उमेदवार जातीनिहाय आकड्यांचा आधारे आपल्या मतांची गणना करत आहे.

या साठी त्याची तयारी वर्षभर अगोदर सुरु होते, अनेक महापुरुषांच्या जयंती,पुण्यतिथी साजरी करून त्या समाजाचा नेत्यला तिथे बोलीविले जाते व पक्ष प्रवेश आणि काही आमिष दिले जातात, नंतर सोशल मिडिया व प्रसार माध्यमातून जाहिरात केली जाते.

निवडणुकीचा काळात अनेक समाजाचे नेते पदाधिकारी कोणत्यान कोणत्या नेते मंडळी सोबत फिरताना दिसतात व समाजाचा पाठिंब्याचे पत्र त्या उमेदवाराला देऊन समर्थन देत आहे. पण काही सामाजिक नेते बाटली आणि काही पैश्यासाठी आपल्या समाजाचे समर्थन देताना या निवडणुकीत पाहायला मिळत आहे.

उमेदवार मंदिर, सभागृह, समाज मंदिर, नगद पैसे आणि खूप काही असे आमिष देऊन मला या समाजाचे मत १००% मिळतील असा विश्वास मतदार संघात दाखवून खोटा प्रचार केला जात आहे, एक रुपया देऊन शंभर रुपये दिल्याचे उमेदवार सांगतात आणि निवडून आल्यावर त्या समाजाला विचारात नाही व बिकाऊ समाज म्हणून त्या समाजाची पुढे पाच वर्ष ओळख असते. मग त्या समजाचा आधारावर निवडून येणारा उमेदवार कोटी रुपयाचे भ्रष्टाचार करतो.

खरच आपला समाज एवढा स्वस्त झाला आहे का? उमेदवाराला समाजाचा नावावर दोन रुपयाचा कागदावर लिहुन पाठींबा देणारे खरच आपल्या समाजचे नेते आहे का ? यांना या प्रश्नाचा उत्त्तर कोण विचारणार? हा विचार या निवडणुकीत करणे गरजेचे आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!