मुर्तीजापुर (प्रेमराज शर्मा ) १३ ऑक्टोबर २४ – काही दिवसात आचारसंहिता लागु होऊन निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे या मुळे राजकारणी मंडळीचा ताप चांगलाच वाढला असून, उमेदवाराची गर्दी प्रत्येक पक्षात पाहण्यास मिळत आहे.
असेच चित्र सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आहे, पण यामध्ये मुर्तीजापुर बार्शीटाकळी मतदारसंघ ३२ मध्ये रेकॉर्ड ब्रेक उमेदवारांची गर्दी पाहण्यास मिळत आहे. मतदारसंघ ३२ मध्ये जर कोणत्या पक्षात भावी उमेदवारांची गर्दी दिसत असेल तर तो फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गट.
दररोज नवनवीन इच्छुक उमेदवारांचे मतदारसंघ ३२ मध्ये फलक, सोशल मीडियाचे पोस्ट व वृत्तपत्रान मध्ये बातम्या वेग वेगळे कार्यक्रम आंदोलन अश्या अनेक माध्यमातून उमेदवार आपली फोकलट दावेदारी पक्षा समोर व जनतेसमोर ठेवत आहे. पण असो लोकशाही असल्यामुळे आपली दावेदारी कोणी पण दाखवू शकतो.

पण या दावेदारी करणार्या इच्छुकाची संख्या आपल्याला माहित आहे का?
विश्वासू सुत्रांच्या माहिती प्रमाणे यांची एकूण संख्या आहे १५
प्राप्त माहितीनुसार निसर्ग मंगल कार्यालय मार्केट यार्ड, पुणे येथे काही दिवसापूर्वी उमेदवारांची मुलाखात घेण्यात आली. त्यामध्ये एकूण १५ भावी उमेदवारांना आपल्या मुलाखती दिल्या मुलाखतीच्या वेळेस पक्षाच्या दिग्गज नेते मंडळी ने हि मुलाखात घेतली.
कोण आहेत भावी उमेदवार?
१) विश्वनाथ कांबळे (प्रदेश सरचिटणीस) २) रवी राठी (प्रदेश संघटक सचिव) ३)आनंद उर्फ पिंटू वानखडे (जिल्हा महासचिव )
४) सम्राट डोंगरदिवे (प्रदेश संघटक सचिव) ५) तेजस जामठे ( युवक प्रदेश सरचिटणीस) ६) धनराज खिराळे (जिल्हा उद्योग व व्यापार सेल )
७) गजानन भटकर ( जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग) ८) नरेश विल्हेकर ( जिल्हा परिषद सदस्य ) ९) शामराव वाहुरवाघ (जिल्हा उपाध्यक्ष)
१०) गोपालराव कंटाळे (जिल्हा उपाध्यक्ष) ११ ) शेखर वाकोडे १२) महेश धनगाव १३) योगेश सोनोने १४) दयारामजी घोडे १५) सौ. राजश्री खडसे
पण पक्षाला फक्त एकच उमेदवार घोषित करायचे आहे. आता १५ मधून काही उमेदवार सध्या रेस मध्ये असून पक्ष त्यांचा विचार करीत आहे त्या मध्ये

१) विश्वनाथ कांबळे (प्रदेश सरचिटणीस) – हे पक्षाचे जुने कार्यकर्ते असून पवार साहेबांचा अधिक निकटवर्तीय व विश्वासू व्यक्तिमत्व आहे .
२) रवी राठी (प्रदेश संघटक सचिव) – हिंदू दलित असून पक्षाचा प्रोटोकॉल प्रमाणे त्यांनी मागील निवडणूकित चांगली मते मिळवली ,मागील पाच वर्षात त्यांनी खूप चांगली कामगिरी केली असून पक्ष वाढविण्याचे कामं सतत सुरु ठेवले तसेच जनसंपर्क पण त्यांचा खूप चांगला आहे.
३)आनंद उर्फ पिंटू वानखडे (जिल्हा महासचिव) – जिल्हास्तरावरील नेते असून पक्ष बांधणी साठी व मोलाची कामगिरी असून त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे व जनसंपर्क संपूर्ण जिल्ह्यात चांगला असून छुपा रुस्तम नेता अशी त्यांची ओळख आहे.
४) सम्राट डोंगरदिवे (प्रदेश संघटक सचिव) – दोन वेळेस जिल्हा परिषद निवडणूक लढली असून विजय झाले व दोन सर्कल मध्ये त्यांची चांगली पकड आहे. तसेच एक वेळेस जिल्हा परिषद सभापतीपद भूषविलेले आहे. निवडणुकी साठी जोरदार तयारी सध्या करत आहे.
५) तेजस जामठे – सुशिक्षत उमेदवार आहे पण मतदार संघ बाहेरील नवीन उमेदवारावर विश्वास करेल का ?
पण मात्र पवार साहेब व पक्ष हे कदी पण पक्षाचा भविष्याचा विचार करून निर्णय घेत असतात. प्रश्न फक्त या निवडणुकी पुरता नसून लोकसभेच्या अग्नी परीक्षे मध्ये कोण कोणत्या नेत्याने आपले योगदान पक्षा साठी दिले व खंबीर पणे उभे राहिले, तसेच कोण संधीसाधू व्यक्तित्व आहे याचा पण विचार करून तुतारी मतदारसंघ ३२ मध्ये आपला उमेदवार देण्याच्या पूर्वी या सगळ्या घोष्टीनचा विचार करून ठरवतील का ?
