Join WhatsApp group

Ads

पीएसआयपदी नियुक्तीबद्दल राजूभाऊ वानखडे यांचा सत्कार

By Sarkar Maza

May 2, 2026 7:25 pm

Ads

मूर्तिजापूर येथे सिद्धार्थ नगर येथील मरी माता मंदिरात राजूभाऊ वानखडे यांच्या पीएसआयपदी नियुक्तीच्या निमित्ताने उत्साहात स्वागत समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन रविभाऊ बाळकृष्ण वाकपांजर यांनी केले होते. यावेळी छोटेखानी सत्कार सोहळ्यासह भोजन कार्यक्रमाचाही आनंद उपस्थितांनी घेतला.


या समारंभाला परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये मनोज माणिकचंद अग्रवाल, श्याम भाऊ बोरकर, प्रमोद गावंडे, सय्यद इस्तेहात मानावाले, अशोक लोंढे, नरसिंग चावरे, सुरज तिवारी, शेख महमूद, शेख जब्बार, मनोज अग्रवाल, श्रीधर अग्रवाल, मनोज द्वारकादास अग्रवाल, अजय अग्रवाल, संजय माने, पिंटू येदवर, शाम येरडावकर, प्रल्हाद मडावी, बन्सीलाल तिवारी, नटवरलाल प्रजाप्रति, माणिक लाल अग्रवाल, शेख रफिक, भय्यू बैसवाल, संजय गोरे, गोलू बुंदिले यांच्यासह समस्त परिवारातील नागरिक व बच्चे कंपनी यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.


कार्यक्रमात राजूभाऊ वानखडे यांचा सत्कार करण्यात आला असून त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!