Join Whatsapp

हिंदुत्वाचा मुद्द्याला बळी पडू नका – राजेश मिश्रा

Photo of author

By Sir

Share

प्रेमराज शर्मा – ४ नोव्हेबर २४ – निवडणूक जवळ आली कि प्रत्येक पक्ष कोणत्या न कोणत्या समाजाला जवळ घेऊन किंवा जातीच्या आधारे आपला मुद्दा बनवितो हे शाश्वत सत्य आहे, असेच काही घडले आज अकोला शहरात.

आज दुपारी राजेश मिश्रा निवडणूक कार्यालय येथे गेल्यावर त्यांना त्यांचा एक मित्रांनी हिंदुत्व बद्दल प्रश्न केले त्या वेळेस तेथे काही गरमागरमी चे वातावरण तयार झाले, पण मित्र अति घनिष्ठ असल्यामुळे तो मुद्दा तिथेच शांत झाला.

पण नंतर या विषयाची चर्चा अख्या शहरात रंगली या वेळेस वेग वेगळ्या प्रसार माध्यमांनी आप आपल्या पद्धतीने बातम्या प्रसारित केल्या सरकार माझा न्यूजने राजेश मिश्रा यांच्याशी या विषयाची विचारणा केली असता त्यांचे म्हणणे होते कि

आज जो हिंदुत्व भाजप मला शिकवत आहे, ते फक्त निवडणुकी पुरता असून उमेदवारला या पासून काही घेणे देणे नाही, जेव्हा भाजपाची सत्ता अकोला महानगरपालिकेवर होती तेव्हा यांनी टिपु सुलतान प्रवेश द्वाराची परवानगी देऊन त्याला समर्थन कसे दिले?

मुस्लीम समाजाचे काही कार्यक्रम असल्यास आज पर्यंत यांनी कदी त्या कार्यक्रमला हजेरी लावली नाही का?

बाळासाहेब ठाकरेंचा विचारावर अमल करून प्रवेश द्वाराचा परवानगी न देण्याचा समर्थनाला आवाहन देणारा एकटा नेता कोण होता हे सार्या शहरला माहित आहे.

निवडणूक पुरता भाजपने मला व मतदार राजाला खोटा हिंदुत्व शिकवू नये. भारताचा संविधाना सर्वधर्मसमभाव या तत्त्वावर चालतो याला कोणी विसरू नये, कारण त्या संविधानावरती लोकशाही सुद्धा टिकलेली आहे.

भाजपा मध्ये मुक्तार अब्बास नक्वी, सैय्यद शहानवाझ हुसैन कोण आहे हे हिंदू मुस्लीम करणार्यांनी जाऊन बघावे.

कथीत हिंदुत्व्चा मुद्द्यावर निवडणुकीला सामाजिक रंग देऊ नये, इथे हिंदू मुस्लीम करण्यासाठी नव्हे तर समाजाची सेवा करण्यासाठी राजेश मिश्रा कोणत्या अमिषाला व दबावाला न बळी पडता निवडणूक लढणार आहे. आणि भाजप उमेदवार पेक्षा मी किती खरा हिंदू आहे हे मला कोणी समजवण्याची गरज नाही. निवडणुकीचा माध्यमातून समाजाला समाज सेवक हवा आहे ना कि हिंदू मुस्लिम करणारा नेता.

आता विधानसभे मध्ये या विषयाचा वर मतदारात किती चर्चा करतात व भविष्यात याचे परिणाम निवडणुकी वर काय होईल, हे पाहणे रोचक ठरणार आहे


Share

Leave a Comment

error: Content is protected !!