Join WhatsApp group

ऑपरेशन प्रहार” अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा व हिवरखेड पोलीसान कडून अवैध धंदे वर छापा कारवाई. जुगार व प्रतिबंधित केलेला पानमसाला गुटखा असा एकूण 06 लाखाचा मुद्देमाल जप्त

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : दि.१० : अकोला –पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार जिल्हाभर सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ मोहिमेअंतर्गत 9 डिसेंबर 2025 रोजी पोलिसांनी अवैध जुगार, गुटखा आणि तंबाखू साठेविरुद्ध तीन मोठ्या धडक कारवाया करून तब्बल ₹16 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सलग होत असलेल्या या कारवायांनी अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.


बी.के. चौकातील जुगार अड्ड्यावर छापा; 8 जुगारी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे MIDC पोलिस ठाण्याच्या हद्दीत बी.के. चौकात सुरू असलेल्या ‘तितली भवरा’ जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकण्यात आला.
कारवाईदरम्यान 8 जुगारी इसमांना ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये नागेश खेडारे, आकाश भाटकर आदींचा समावेश आहे.

जप्त मुद्देमाल:

  • रोख रक्कम – ₹8,680
  • मोबाईल फोन – ₹50,000
    एकूण जप्ती : ₹58,680

या प्रकरणी MIDC पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


शारली स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये अवैध गुटखा साठा जप्त

दुकान क्रमांक 26, A1 अंडा सेंटर येथे छापा टाकताना मोहम्मद रियाज मोहम्मद फारुख (रा. अनंत नगर) हा प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूचा साठा मोठ्या प्रमाणात बाळगताना आढळला.

जप्त मुद्देमाल:

  • वाह पान मसाला – ₹12,000
  • Chewing Tobacco – ₹1,500
  • काळी बहार पान मसाला – ₹14,520
  • BHR खानदानी तंबाखू – ₹3,630
    एकूण जप्ती : ₹31,650

रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद.


हारी नाका येथे बोलेरो पिकअपसह ₹15 लाखांचा गुटखा ताब्यात

HC प्रफुल पवार पेट्रोलिंगदरम्यान वन विभागाच्या माहितीवरून हारी नाका येथे नाकाबंदी करण्यात आली.
काही वेळातच महिंद्रा बोलेरो पिकअप (MH04 GF 5130) वाहन अडवून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात बंदी असलेला गुटखा व तंबाखू आढळून आला.

जप्त मुद्देमाल:

  • सागर 2000 पान मसाला (18 पाकिटे) – ₹28,260
  • सागर पान मसाला (27 पाकिटे) – ₹23,645
  • विमल पान मसाला – ₹1,496
  • इतर तंबाखू – ₹699
  • बोलेरो पिकअप वाहन – ₹5,00,000
    एकूण जप्ती : ₹15,14,100

आरोपी: लक्ष्मण बाबूलाल जामूनकर (वय 30, रा. पिंपरखेड)
हिवरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद.


नागरिकांना आवाहन

जिल्ह्यातील कोणत्याही अवैध धंद्याची माहिती लगेच पोलिसांना कळवावी.
नागरिकांच्या गोपनीयतेचे पूर्ण संरक्षण करण्यात येईल, असे आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!