Join WhatsApp group

ऑपरेशन प्रहार अंतर्गत गावठी दारूवर धाड – १८ हजारांचा मुद्देमाल जप्त

Photo of author

By Sarkarmzanews

Share

माना (ता. मूर्तिजापूर) – शनिवार, दिनांक १२ जुलै रोजी ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलीस अधीक्षक अर्चीत चांडक यांच्या आदेशावरून कुरुंम परिसरात गावठी दारू निर्मितीवर धाड टाकण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वानखडे व पो.कॉ. आकाश काळे हे कुरुंम येथे गस्तीस असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की पारधी वाडा, कुरुंम येथे मुकेश चव्हाण नावाचा इसम गावठी हातभट्टी दारू तयार करून विक्री करीत आहे.

त्यानुसार तत्काळ कार्यवाही करत पोलीस पथकाने त्या ठिकाणी धाड टाकून १८,००० रुपये किमतीचा दारूचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई माना पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश नावकर, पो.उपनिरीक्षक राजेंद्र वानखडे, आणि पो.कॉ. आकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गावठी दारूविरोधातील अशा प्रकारच्या मोहीमा भविष्यातही सुरुच राहतील, अशी माहिती ठाणेदार गणेश नावकर यांनी दिली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!