Join WhatsApp group

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी खासगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक 

Photo of author

By Sarkarmzanews

Share

खासगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समितीची नोंदणी ३१ मे पर्यंत करण्याचे आवाहन

मुंबई, दि. : कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी खासगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. या समितीची नोंदणी शी बॉक्स या पोर्टलवर ३१ मे पर्यंत करणे करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई शहर आणि जिल्हा नोडल अधिकारी शोभा शेलार यांनी केले आहे.

नियमांचे पालन न केल्यास संबंधित आस्थापनांवर ५० हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. केंद्र सरकारने सर्व खासगी आस्थापनांना SHE BOX पोर्टलवर अंतर्गत तक्रार समितीची माहिती नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत. नोंदणीसाठी आस्थापनांनी https://shebox.wcd.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन, Private Head Office Registration या टॅबवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी व Submit करावे. सर्व खासगी आस्थापनांनी ही प्रक्रिया ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन तसेच  अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!