दिनांक १९ : मुर्तीजापुर : महागाई म्हणजे काय पहिले थोडक्यात हे समजून घेऊ या?
महागाई दर समजून घेण्याकरिता सर्वप्रथम महागाई म्हणजे काय समजून घेणे आवश्यक आहे. महागाई म्हणजे सोप्या भाषेत एखाद्या वस्तूची गेल्या वर्षीची किंमत आणि त्याची आजची किंमत यामधील फरक. उदाहरणार्थ एखाद्या वस्तू किंवा सेवेची मागील वर्षाची किंमत १०० रुपये असेल आणि या वर्षी त्या वस्तूची किंमत १३० रुपये असेले तर एखादी वस्तू किंवा सेवा ही ३० रुपयांनी महाग झाली. ही किंमतवाढ जर घाऊक किंमतीमध्ये झाल्यास घाऊक महागाई म्हणतात आणि जर किरकोळ किंमतीमध्ये झाल्यास किरकोळ महागाई म्हटले जाते.
अशिच महागाई सध्या मुर्तीजापुर तालुक्यात गुटखा व्यवसाया मध्ये पाहायला मिळत आहे, मागचा आठवड्यात तालुक्यात गुटखा माफियांनी जाणून गुटख्याची विक्री कमी केली होती. माल नाही मिळत आहे, प्रशासना कळून सध्या परमिशन नाही, बोरगाव मंजू वरून माल येत नाही. स्टेशन समोरील दुकाना वर सुद्धा माल नाही.
असे अनेक कारण छोट्या व्यावसायिकांना देत गुटख्याची पूर्तता फेरीवाल्यांनी व तालुक्यातील दुकानदारांनी कमी केली. मग सुरु झाला बाजारात मागणी आणि पुरवठयाचा खेळ, फेरी करणार्यांनी व दुकानदारांनी हळूच छोट्या व्यावसायिकांना भाव वाढवून गुटखा विक्री कारयला सुरुवात केली.
या प्रमाणे तालुक्यात गुटखा माफियांनी आपली तल्लख व्यावसायिक बुद्धी लावत गुटख्याचे तालुक्यात भाव वाढविले व एका गुटख्याचा बांद्या मागे २० ते ६० रुपयांचे भाव वाढविले.
काय आहे सध्या गुटख्याचे भाव –
वाह – पहिले १३० रुपये आता – १८०
विमल – पहिले १२५/३० रुपये आता – १७०
बाजीराव – पहिले १२२/१३० रुपये आता – १४५
बडी विमल – पहिले १९० रुपये आता – २४०
पान पराग – पहिले ११५ रुपये आता – १५०
पान बहार – पहिले १९० रुपये आता – २३५/४०
या भाव वाढी मुळे नक्की फायदा कोणाचा ? अशी चर्चा सध्या जनतेमध्ये सुरु आहे. गुटख्याचा काळा बाजार कसा चालतो या पासून सामान्य जनता, प्रशासन व राजकारणी अनभिज्ञ नाही.
गुटखा बंदी विषयी चर्चा केल्यास प्रशासनाचा काही अधिकारी वर्ग व गुटखा माफियांचा जीवावर येते तरी या विषयावर चर्चा काही अर्थ नाही कारण गुटखा बंदी अशक्य आहे.
कारण पोरा पेक्षा नातू कोणत्याही व्यक्तीला (अधिकारी) चांगले वाटतो.

