Join WhatsApp group

पोलीस वसाहतीत पोलीस कर्मचाऱ्यांचा महिलांवर हल्ला : अज्ञात महिलांकडून शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्या

Photo of author

By Sarkarmzanews

Share

पोलीस कर्मचाऱ्यांचा महिलांन वर हल्ला तर सामन्या जनतेचा सुरक्षेचा प्रश्न गंभीर

अकोला | ३ जुलै २०२५

अकोल्यातील दक्षता कॉलोनी परिसरातील पोलीस वसाहतीत मोठी गोंधळाची व चिंताजनक घटना समोर आली आहे. वसाहतीत राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिलांना अज्ञात महिलांनी शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच त्यांच्या मुलांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या.

या संदर्भात महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, २९ जून रोजी रात्री १० च्या सुमारास वसाहतीतील सुमारे १५ महिला आपल्या मुलांसह जेवणानंतर फेरफटका मारत होत्या. त्याचवेळी काही अज्ञात महिला आणि पुरुषांनी वसाहतीत बेकायदेशीरपणे प्रवेश करून त्या महिलांना उद्देशून अश्लील शिवीगाळ सुरू केली. जेव्हा वसाहतीत राहत आहात का, अशी विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी आक्रमकपणे उत्तर दिले आणि धमकी देत संवाद टाळला.

महिलांनी सावधतेचा सल्ला देत क्रिकेट खेळणाऱ्या मुलांपासून दूर राहण्यास सांगितले असता, अज्ञात महिलांनी अपशब्दांचा मारा केला. पोलिसांना फोन करण्याचा इशारा देताच त्या महिलांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्धही अपमानास्पद भाषेत बोलणे सुरू केले.

थोड्याच वेळात त्या महिलांनी कोणालातरी फोन केला आणि काही पुरुष घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तिथे उपस्थित महिलांवर थेट हात उचलला. निघताना या अज्ञात व्यक्तींनी धमकी दिली की, “तुमची मुले जर बाहेर फिरताना दिसली, तर कोणतंही वाहन त्यांना धडक देईल, आणि कोणालाच कळणारही नाही.”

या प्रकारामुळे वसाहतीतील महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून, कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सुरक्षेचा गंभीर प्रश्न
या घटनेने पोलीस वसाहतीतच जर सुरक्षितता नसल्याचे चित्र उभे राहत असेल, तर सामान्य जनतेसाठी पोलीस विभाग किती कार्यक्षम आहे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

स्थानिक नागरिक आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तत्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!