Join WhatsApp group

पवन हलवणे बीसीसीआय पंच परीक्षेत देशात प्रथम

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला | प्रतिनिधीअकोला क्रिकेट क्लबचा खेळाडू आणि पंच पवन हलवणे याने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर जून २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बीसीसीआयच्या लेव्हल-२ पंच पॅनल परीक्षेत देशातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याने १५० पैकी १४७.५ गुण मिळवत ही ऐतिहासिक कामगिरी केली.

पवन हलवणे याची क्रिकेटशी नाळ लहानपणापासून जोडलेली आहे. वयाच्या केवळ १२ व्या वर्षी त्याने सांगवी बाजार येथून रोज अकोला क्रिकेट क्लबमध्ये सराव सुरु केला. त्यानंतर १६ वर्षांखालील विदर्भ क्रिकेट संघाचे व अमरावती विद्यापीठ क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. खेळाडू असतानाच त्याने प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे.

पंच म्हणून सुरुवात अकोला क्रिकेट क्लबमध्ये झाल्यानंतर, त्याने व्हीसीए (विदर्भ क्रिकेट असोसिएशन) अंतर्गत विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट पंचगिरी सादर केली. ग्रामीण मराठी शाळेत शिक्षण घेऊनही त्याने इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवत देशपातळीवरील परीक्षेत यश मिळवले, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.

अकोला क्रिकेट क्लबने खेळाडू घडवण्याबरोबरच व्हिडिओ विश्लेषक, प्रशिक्षक आणि पंच अशा विविध भूमिकांमध्ये दर्जेदार व्यक्तिमत्त्व घडवले आहेत. पवन हलवणे याची ही यशस्वी वाटचाल अकोला व विदर्भातील नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारी आहे, असे मत क्लबचे कर्णधार व विदर्भ क्रिकेट संघटनेचे जिल्हा संयोजक भरत डिक्कर यांनी व्यक्त केले.

पवन हलवणेच्या यशाबद्दल अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष विजय देशमुख, सचिव सुरेश पाटील, सहसचिव गुरुचरनसिंग अंधरेले, ऑडिटर विवेक विजवे, मार्गदर्शक विजय तोष्णीवाल, तसेच क्लबचे पदाधिकारी व खेळाडू यांच्याहून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी क्रीडा परिषद सदस्य जावेद अली, ॲड. मुन्ना खान, परिमल कांबळे, प्रशिक्षक सुमेद डोंगरे, अमित माणिकराव, शारिक खान, अभिजित मोरेकर, किशोर धाबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!