Join WhatsApp group

ॲकॅडमिक हाईट्स मध्येजागतिक सूर्यनमस्कारदिनाचे आयोजन

Photo of author

By Sarkarmzanews

Share


दिनांक ०५ : मुर्तीजापुर : संपूर्ण जगभरात जागतिक सूर्यनमस्कार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विशेष दिनानिमित्त मूर्तीजापुर येथील प्रतिष्ठित ॲकॅडमीक हाईट्स पब्लिक स्कूल येथे जागतिक सूर्यनमस्कार दिन मोठ्या उत्साहात पार पडला. रोज सकाळी नियमितपणे होणाऱ्या परिपाठात जागतिक सूर्यनमस्कार दिनाचा समावेश करून विद्यार्थ्यांमध्ये योगासनाचे महत्त्व बिंबवण्यात आले. सूर्यनमस्कार केवळ व्यायाम नसून तो मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी एक संपूर्ण साधना आहे.

याच्या नियमित सरावामुळे स्नायू बळकट होतात, पचनक्रिया सुधारते आणि मानसिकस्थैर्य मिळते. विशेषतः विद्यार्थ्यांनी याचा आपल्या दैनंदिनी मध्ये समावेश केल्यास त्यांचे आरोग्य सुधारते, असा महत्वपूर्ण संदेश शाळेचे प्राचार्य डॉ. धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना दिला. ते म्हणाले की, सूर्यनमस्कार ही एक साधी पण प्रभावी प्रक्रिया आहे. दररोज काही मिनिटे सूर्यनमस्कार केल्यास आरोग्य विषयक अनेक समस्या टाळता येऊ शकतात.

त्यामुळे हा जागरूकता दिन फक्त औपचारिकता न राहता विद्यार्थ्यांनी योगाला आपल्या दिनचर्येचा भाग बनवावा असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिला.
त्या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या भव्य ग्रीन टर्फ या क्रीडांगणावर करण्यात आले. सर्व विद्यार्थी व संपूर्ण शिक्षक वर्ग यांनी अत्यंत आल्हाददायक वातावरणात सूर्यनमस्कारांचे धडे घेतले.

यामध्ये सूर्यनमस्काराच्या बारा आसनांचा समावेश केला होता. ते म्हणजे प्रणामासन, हस्तउत्तानासन, पादहस्तासन, अश्वसंचालनासन, दंडासन, अष्टांग नमस्कार ,भुजंगासन, अधोमुखश्वानासन (पर्वतासन) इत्यादी आसनांचा समावेश होता.
डोळे दिपवून टाकणाऱ्या अशा या कार्यक्रमात शाळेचे योग शिक्षक सचिन वाकोडे, मुख्य समन्वयक अभिन राज व संपूर्ण शिक्षक गण उपस्थित होते.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!