Join WhatsApp group

अकोला शहरात पुन्हा एकदा महिला अत्याचाराचा प्रयत्न कार मध्ये तरुणी वर अत्याचार – वाढता महिला अत्याचार गंभीर प्रश्न

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला – अकोला शहरात गुन्हेगारीच्या घटनांनी उग्र रूप धारण केलं असून, महिला अत्याचारासारख्या घटनांमध्ये होणारी वाढ ही चिंतेचा विषय ठरत आहे.

अशाच एका धक्कादायक घटनेत शहरातील जठारपेठ परिसरात एका २२ वर्षीय तरुणीवर कारमध्ये अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्या तरुणीने प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव केला आणि आरोपीच्या प्रायव्हेट पार्टवर वार करत त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली.

ही तरुणी आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये युनिट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. तिच्यासोबत काम करणाऱ्या गणेश ठाकूर या एजंटनेच तिला बहाण्याने कारमध्ये बोलावून अत्याचाराचा प्रयत्न केला. या नंतर तरुणीने कशीतरी आपली सुटका करून थेट सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली.

पोलीसांनी गणेश ठाकूरविरोधात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपी अद्याप फरार आहे आणि त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

या घटनेनंतर अकोला शहरात महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांचा धाक कमी झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवरही ऑटो रिक्षाचालकाने अत्याचाराचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ अटकेची कारवाई केली होती, मात्र वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे आरोपींना कायद्याचा फारसा धाक राहिलेला नाही, असे चित्र दिसत आहे.

स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी अशा घटनांवर कठोर कारवाई करावी आणि शहरात महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.

🟠 गुन्हेगारी वाढीवर नियंत्रणासाठी प्रशासन सजग होणार का?

महिला सुरक्षेचा प्रश्न आता अत्यंत गंभीर बनत असून, अकोल्यातील वाढती गुन्हेगारी पाहता पोलिसांनी अधिक प्रभावी आणि कठोर भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा कायद्याचा धाक पूर्णपणे नाहीसा होईल आणि गुन्हेगार अधिक बिनधास्त होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!