Join WhatsApp group

Ads

बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल; मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By Sarkarmzanews

February 7, 2026 3:36 pm

Ads

मुर्तिजापूर : बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून अश्लील मजकूर, फोटो व व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुर्तिजापूर येथील एका महिलेच्या तक्रारीवरून आरोपी आकाश लक्ष्मण कांबळे (वय ३५ वर्ष, रा. पिंपरी चिंचवड, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने महिलेच्या मैत्रिणीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून त्यावर अश्लील मजकूरासह फोटो तसेच अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप आहे.महिलेने आरोपीस याबाबत विचारणा केली असता, आणखी फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (C), 67 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 79, 351 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) सुर्यवंशी करत असून गुन्हा दाखल अधिकारी महिला हवालदार शालिनी सोळंके यांनी नोंद केली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!