Join WhatsApp group

अकोला जिल्ह्यातील कुख्यात गुंड पवन गुंजाळ वर्षभरासाठी स्थानबद्ध

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला (प्रतिनिधी) – सन 2025 मधील अकोला जिल्ह्यातील सोळावा धोकादायक व्यक्ती म्हणून घोषित झालेला पवन संजय गुंजाळ (वय 22, रा. वंडरपूर स्टेशन विभाग, मूर्तिजापूर) याला एमपीडीए कायद्यान्वये एका वर्षाकरिता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

पवन गुंजाळ याच्यावर यापूर्वी घातक शस्त्रांनी दुखापत करणे, बेकायदेशीर हत्यारे बाळगणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन, अश्लील कृती व गाणी, सार्वजनिक शांतता भंग करणे, अपमान करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

त्याच्यावर विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती, मात्र त्याचा त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नव्हता.

या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी कायदेशीर पडताळणीनंतर पवन गुंजाळ हा अत्यंत धोकादायक असल्याचे निश्चित केले. त्यानंतर 12 ऑगस्ट 2025 रोजी आदेश काढून त्याला एका वर्षाकरिता जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. आदेशाची अंमलबजावणी तत्काळ करून त्याला कारागृहात हलविण्यात आले.

ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी व वैशाली मुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय शेळके, पीएसआय माजी पठाण, मुर्तीजापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजित जाधव, पीएसआय आशिष शिंदे, गणेश सूर्यवंशी आणि पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून करण्यात आली.अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, तसेच येणाऱ्या निवडणुका व सण-उत्सव काळात शांतता राखण्यासाठी अशा सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए आणि इतर प्रचलित कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिला आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!